शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील एसटी स्टँडमध्ये बॉम्बची अफवा

By admin | Updated: June 17, 2016 02:12 IST

स्मार्ट सिटीसंदर्भातील परिषेदसाठी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या पूर्वेतील एमआयडीसीतील एसटी स्टँडममधील एका बेवारस खोक्यात बॉम्ब असल्याच्या निनावी फोनमुळे

डोंबिवली : स्मार्ट सिटीसंदर्भातील परिषेदसाठी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या पूर्वेतील एमआयडीसीतील एसटी स्टँडममधील एका बेवारस खोक्यात बॉम्ब असल्याच्या निनावी फोनमुळे यंत्रणांची धावपळ उडाली. टिळकनगर पोलीस ठाण्यात गुरूवारी आलेल्या फोननंतर पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने घटनास्थळी तपासणी केली असता त्यांना रिकामा खोका आढळला. ही अफवा असल्याचे स्पष्ट होताच पोलीस आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.एसटी स्टँडमधील एका बाकावर दुपारी बेवारस खोका आढळल्याने प्रवाशांत घबराट पसरली. यासंदर्भात पोलीस ठाण्यात निनावी फोन आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एसटी स्टँडमधून प्रवाशांना दूर नेण्यात आले. काही वेळातच बॉब शोधक व नाशक पथक घटनास्थळी पोहोचले. खोक्याची तपासणी केल्यावर तो रिकामा असल्याचे स्पष्ट झाले. कुणीतरी खोडसाळपणाने हा खोका जाणून बुजून तेथे ठेवला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला. डोंबिवली हे दहशतवाद्यांचे पुढील लक्ष्य असेल, असा व्हिडिओ इसिसने जारी केला होता. तसेच कल्याणमधील काही तरूण इसिसमध्ये गेल्याच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी मंदिरांची तपासणीही करण्यात आली होती.दरम्यान, स्मार्ट सिटीच्या शिखर परिषदेसाठी मुख्यमंत्री शुक्रवारी कल्याणमध्ये येणार असतानाच आदल्या दिवशी बॉम्बचा निनावी फोन आल्याने सर्वांचेच धाबे दणाणले होते.(प्रतिनिधी)