शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

बोईसर ग्रामपंचायतीचे स्पेशल आॅडिट ?

By admin | Updated: August 12, 2016 01:26 IST

बोईसर ग्रामपंचायतीच्या १८ जुलै २०१६ पूर्वीच्या कार्यकालामध्ये झालेल्या व्यवहारामध्ये अनिमितता, चुकीच्या पद्धतीने केलेली कामे आणि गैरव्यवहार झाला आहे काय?

बोईसर : बोईसर ग्रामपंचायतीच्या १८ जुलै २०१६ पूर्वीच्या कार्यकालामध्ये झालेल्या व्यवहारामध्ये अनिमितता, चुकीच्या पद्धतीने केलेली कामे आणि गैरव्यवहार झाला आहे काय? याची शहनिशा करण्यासाठी बोईसर ग्रामपंचायतीच्या मागील कार्यकालाचे स्पेशल आॅडिट करण्याची मागणी नवनिर्वाचित बोईसरच्या सरपंच व उपसरपंचांनी पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे. त्यांनी स्पेशल आॅडीट करण्याचे संकेत दिले आहेत. बोेईसर ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली बाबतर व उपसरपंच राजू करवीर यांनी त्यांच्या काही सहकारी सदस्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ग्रामपंचपायतीचा दि. १८ जुलै रोजी कार्यभार स्वीकारला त्या दिवशी ठाणे डिस्ट्रीक्ट बॅकेमधील पाणीपुरवठा खात्यामध्ये अवघे ७२६ रूपये शिल्लक होते तर दि. १५ जुलै २०१६ रोजी मुद्रांक शुल्काच्या रूपात जमा झालेला ४५ लाख ५० हजाराचा निधी ज्या दिवशी डिपॉझीट झाला त्या एकाच दिवशी त्याचे वाटप केले. त्यापैकी काही रक्कम रोखीने तर काही बेअरर चेकने दिली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून निधी अभावी आम्ही कार्यभार कसा सांभाळणार असा सवाल केला. अस्तीत्वात नसलेल्या झेरॉक्स कॉपीचे, ग्राम-पंचायतीच्या दोन सायकलच्या दुरूस्तीचे तसेच वृत्तपत्रात दिलेल्या जाहिराती इ. वर लाखो रूपये खर्च दाखविण्यात आला असून कायम स्वरूपी सफाई कामगार असतांनाही अनेक अतिरीक्त कामगार ठेका पध्दतीने (रोजंदारी) दाखवून त्यामध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सन २०१५-१६ या वित्तीय वर्षामधील व्हॉऊचर वर सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांची सहीच नसल्याचे सांगून मोठया प्रमाणात अपहार झाल्याची शक्यता वर्तविली गेली असून अशाच पध्दतीची तक्रार बसपाचे पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव यांनीही केली असून संबंधीतांवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यानच्या काळामध्ये वरीष्ठ लिपिक संतोष मराठे यांनी लक्ष्मण कॉम्पलेक्स कडून आलेल्या निधीची कॅशबुकमध्ये एन्ट्री न कराता तो निधी तेथील रस्त्यांच्या कामासाठी खर्च केला असल्याचे उपसरपंच करवीर यांनी सांगून या संदर्भात खुलासा मागणारे पत्र मराठे यांना देण्यात आले होते त्याला उत्तर देतांना या घटनेची संपूर्ण चौकशी पंचायत समिती मार्फत झाली असल्याचे उत्तर देण्यात आले परंतु, हा खुलासा समाधानकारक नाही म्हणून त्यांना चौकशी काळापर्यंत निलंबनाचे पत्र दि. १० आॅगस्ट रोजी काढण्यात आले होते. परंतु ते पत्र मराठे यांनी स्वीकारले नाही तर या निलंबन पत्रानंतर तसेच चर्चेतून काही मार्ग न निघाल्यास ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा संप होण्याची शक्यता आहे.