शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बोईसरच्या रस्त्यांना खांबाचा अडसर

By admin | Updated: April 23, 2016 01:48 IST

अनेक अडथळ्यांवर मात करून पालघर-बोईसर या मुख्य रस्त्यावरील नवापूर नाका ते साईबाबा मंदिर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊनही विजेचे काम जैसे थे स्थितीमध्ये आहे

बोईसर : अनेक अडथळ्यांवर मात करून पालघर-बोईसर या मुख्य रस्त्यावरील नवापूर नाका ते साईबाबा मंदिर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊनही विजेचे काम जैसे थे स्थितीमध्ये आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असल्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यात असलेल्या वीजखांबांमुळे अपघाताची शक्यता आहे. पालघर-बोईसर रस्ता प्र.रा.मा.क्र. ४ किमी ११/७०० ते १२/१०० मध्ये सदर चौपदरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. १ पालघर यांच्यामार्फत हाती घेण्यात आले असून हे काम बहुतांश पूर्ण होऊन आता गटारलाइनचे काम सुरू आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याने वीज वितरण कंपनीला खांब हटवण्यासंदर्भात पत्र देऊनही अजून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. गटाराच्या कामातही काही झाडांचा अडथळा येत आहे. काम सुरू असलेले गटार सांडपाण्याने तुडुंब भरले आहे. २००६ मध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याने मोजणी करून नकाशा तयार केला होता. मात्र, सध्या सुरू असलेले काम हे नकाशानुसार नसून रस्त्याची मध्यरेषा आखताना संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याचे बोईसरचे माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन ठाकूर यांनी सांगितले. तसेच रस्त्यावरील विजेचे खांब हटवण्यासंदर्भात सिटीझन फोरम आॅफ बोईसरतर्फे महावितरणला निवेदन देण्यात आले असल्याचे फोरमचे अध्यक्ष डॉ. सूर्यकांत संखे यांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर)