शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन नगरसेवकांच्या पदव्या बोगस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:29 IST

ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य नम्रता भोसले आणि विक्रांत तावडे यांच्या पदव्यांवर कोर्टानेच संशय व्यक्त केला आहे.

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य नम्रता भोसले आणि विक्रांत तावडे यांच्या पदव्यांवर कोर्टानेच संशय व्यक्त केला आहे. असे असतानाही त्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याऐवजी त्यांना वनखात्याच्या शिफारशीवरून पुन्हा सदस्यपद बहाल करण्यात येत आहे. बोगस पदवी धारण करणाऱ्या या दोघांची चौकशी केल्याशिवाय समिती जाहीर करण्यात येऊ नये, अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.ठामपाच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यपदासाठी माजी नगरसेविका नम्रता भोसले आणि विक्रांत तावडे यांच्या नावांची शिफारस केली आहे. मात्र, या दोघांच्या शैक्षणिकपात्रतेसंदर्भात मोठा संभ्रम आहे. या दोघांनी हिमालयीन युनिव्हर्सिटी, इटानगर, अरुणाचल प्रदेश येथील पदवी सादर केली आहे. विशेष म्हणजे एकाच वर्षात या दोघांनी पदवी घेतली आहे. तावडे यांनी मे २०१७ मध्ये बॅचलर आॅफ सायन्सची, तर भोसले यांनी डिसेंबर २०१७ मध्ये डिप्लोमा आॅफ अ‍ॅग्रीकल्चर अशी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे दाखवले आहे. त्यांच्या या शैक्षणिकपात्रतेवर संशय व्यक्त केलेला असतानाही पुन्हा त्यांचीच या समितीवर वर्णी लावण्यात येत आहे. वास्तविक, कोर्टाने संशय व्यक्त केलेला असतानाच चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची गरज होती. मात्र, तसे न करता सदस्यपद बहाल करण्यामागे काळेबेरे असल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे या दोघांनीही ज्या विद्यापीठातून पदवी घेतली आहे, त्या विद्यापीठाचे कुलगुरू-प्राचार्य यांचे प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे. त्यांनी वर्गात हजेरी लावली होती का, हजेरीपटावरील त्यांची उपस्थिती आणि शिक्षण घेत असताना ते कुठे राहिले होते, याचा शोध घ्यावा. त्यानंतरच समिती गठीत करावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.

डिप्लोमा आॅफ अ‍ॅग्रीकल्चर हा पदविका कोर्स मी हिमालयीन युनिव्हर्सिटीतून केला असून, त्याची रितसर परीक्षा दिलेली आहे. डिसेंबर २0१७ मध्ये मी अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाली. त्याची सर्व कागदपत्रे मी सादर केलीत. माझ्या पदविकेवर न्यायालयानेही कधीच संशय व्यक्त केला नाही. माझ्या शैक्षणिक अर्हतेविषयी सर्व कागदपत्रे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत. आमदार आव्हाड करीत असलेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरीत आहेत. कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे. - नम्रता भोसले (जाधव)

टॅग्स :thaneठाणे