कल्याण : वैद्यकीय व्यवसायासाठी करण्यासाठी प्रमाणपत्र नसतानाही रु ग्णालय थाटून रु ग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस महिला डॉकटरला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. अनिता एस. उर्फ अनिता पोपट सावंत उर्फ अनिता मुरलीधर लोंढे उर्फ अनिता मोहम्मद हिल काश्मिरी अशी तिची नावे आहेत. तिने मानपाडा रोडवरील उंबार्ली रोडवर साईबाबा निर्संग होम थाटले होते. त्यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी छापा टाकला असता तिच्याजवळ अधिकृत प्रमाणपत्र आढळले नाहीत. मात्र, अॅलोपॅथीची औषधे सापडली. दरम्यान, स्व:ताच्या आर्थिक फायद्यासाठी नागरिकांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत तिच्याविरोधात गुन्हा नोंदवल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बोगस महिला डॉक्टर गजाआड
By admin | Updated: April 1, 2017 05:30 IST