शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

योजनांचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांची खैर नाही; कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 00:58 IST

खऱ्या लाभधारकांना मिळेल दिलासा

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यात संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी आदी विविध अर्थसाहाय्य योजना राबविण्यात येत आहेत. वयोवृद्धांसाठी श्रावणबाळ सेवा योजना, अनाथ, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, दिव्यांग,  आदींकडून दरमहा या योजनांच्या अर्थसाहाय्यांचा लाभ घेतला जात आहे. मात्र, योजनांच्या निकषांत न बसणारेही त्याचा लाभ घेत आहेत. अशा लाभार्थ्यांवर कारवाईच्या हालचाली जि.प.ने सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात विशेष साहाय्य योजनेंतर्गत अनुदान वाटपाच्या योजना सुरू आहेत.  दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असलेल्या ६५ व ६५ वर्षांवरील वृद्धांना इंदिरा गांधी  वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन सुरू आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनाही राबविण्यात येत आहे. इंदिरा गांधी योजनेद्वारे लाभार्थ्यांना प्रतिमहा २०० व ५०० रुपये निवृत्ती मिळते. त्याचा लाभ जिल्ह्यातील ४,२९३ वृद्धांना मिळतो. यंदा ७१ लाखांचे अनुदान मिळाले होते. त्यातून ऑगस्टपर्यंत ६२,५१,५०० पर्यंतचे अनुदान वाटप झाले आहे. लाभार्थी कुठल्या योजनेचे किती?संजय गांधी योजना : ९४५७श्रावणबाळ योजना : ४९९६इंदिरा गांधी योजना : ४२९३एकूण                : १८७४६घटस्फोटित लाभार्थी लाभार्थी महिलेचा पुनर्विवाह झाला का, याची चौकशी होईल. यासाठी रेशनकार्डची सत्यता पडताळून पाहिली जाणार आहे. परित्यक्ताया महिला बहुधा शासकीय, संस्थेच्या अनाथालयात राहतात. यामुळे या संस्थेत राहात असल्याचा दाखला लाभार्थ्यांना द्यावा लागणार आहे.विधवा महिला लाभार्थी या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेला मुलगा असल्यास आणि तो २५ वर्षांचा झाल्यास या अर्थसाहाय्याचा लाभ बंद होतो. यासाठी संबंधित मुलाच्या जन्माचा, शाळेचा दाखला जोडण्याची सक्ती होते. आता या दाखल्याची चौकशी व तपासणी होणार आहे. मुली असल्यास मात्र या योजनेचा लाभ घेता येणे शक्य होईल. दिव्यांगलाभार्थ्यांना त्यांच्या बँक पासबुकच्या इंट्रीच्या झेरॉक्सप्रती द्याव्या लागला आहे. यामुळे या खात्यातील त्यातील व्यवहारास अनुसरून तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे लाभार्थी अन्य योजनांचाही लाभ घेतात का, याची पडताळणी होईल. जिल्ह्यातील या केंद्र व राज्य शासन पुरस्कृत अर्थसाहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांचे व सर्वेक्षण आणि पडताळणी कोरोनामुळे रखडली होती. पण आता यानुसार लवकरच जिल्ह्यात तपासणी करून बोगस लाभार्थ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल.- शीतल जाधव, तहसीलदार, ठाणे