शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कोव्हिड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या रुग्णाचा खाडीत आढळला मृतदेह, आत्महत्या केल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 23:17 IST

या सेंटरमधून बेपत्ता झालेल्या रुग्णाचा मृतदेह पश्चिमेतील खाडीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

डोंबिवलीः डोंबिवलीच्या हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील स्व. सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडा संकुलात केडीएमसीने कोव्हिड सेंटर सुरू केले आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी या सेंटरमधून बेपत्ता झालेल्या रुग्णाचा मृतदेह पश्चिमेतील खाडीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित रुग्णाचे वय ५३ वर्ष आहे. ते पश्चिमेतील  मोठा गाव-ठाकुर्लीत वास्तव्याला होते.कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर 20 जुलै रोजी पूर्वेतील क्रीडा संकुलातील कोव्हीड सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल केले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना 8 दिवसांनी घरी पाठविण्यात आले. मात्र श्वासोच्छश्वास घेण्यास त्रास सुरू झाल्याने पुन्हा त्यांना याच कोव्हीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. गुरुवारी सकाळी 7 च्या सुमारास त्यांनी मित्राला फोन केला. त्यानंतर मोबाईल तेथे ठेऊन ते सेंटरच्या बाहेर पडले. त्यांच्या मुलाने वडिलांच्या मोबाईलवर सतत संपर्क केला. मात्र वडील प्रतिसाद देत नव्हते.म्हणून त्याने सेंटरशी संपर्क साधून वडील कुठे आहेत, याची माहिती विचारली. मात्र तेथिल कर्मचाऱ्यांनी आम्हाला माहीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे मुलाने मानपाडा पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी क्रीडा संकुलातील सेंटरवर जाऊन चौकशी केली असता त्यांनाही रुग्णाबद्दल काहीही माहिती नसल्याचे सांगितले. याच दरम्यान बेपत्ता झालेल्या आपल्या वडिलांचा मित्रांसह शोध घेत असताना पश्चिमेला खाडी किनारी गर्दी दिसून आली. तेथे जाऊन पाहिले असता वडीलांचा मृतदेह त्या ठिकाणी आढळून आला. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय असून याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या यंत्रणेबाबत संताप व्यक्त केला आहे. दरम्यान याबाबत कोव्हीड सेंटरच्या अधिका-यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.