शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह तासन् तास वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : काेराेना काळात रुग्णालयात बेड मिळवताना दमछाक हाेत असतानाच आता मरणानंतरही अंत्यसंस्कारांसाठी स्मशानभूमीत तासन् तास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : काेराेना काळात रुग्णालयात बेड मिळवताना दमछाक हाेत असतानाच आता मरणानंतरही अंत्यसंस्कारांसाठी स्मशानभूमीत तासन् तास प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे नातेवाइकांचे हाल हाेत असून या प्रतीक्षेमुळे मरणयातना भाेगाव्या लागत असल्याचे चित्र स्मशानभूमीत दिसत आहे. शहरात पाच स्मशानभूमी आहेत. त्यात शिवमंदिर स्मशानभूमीत चांगल्या सुविधा आहेत. पश्चिमेतील मोठा गाव, कुंभारखान पाडा या ठिकाणी सुविधांअभावी काेणी जाण्यास फारसे उत्सुक नसते. त्यामुळे पूर्वेतील शिवमंदिर स्मशानभूमीवर ताण पडत आहे.

पाथर्ली, ठाकुर्लीतील चोळेगाव येथेही अशीच स्थिती आहे. सध्या कोविड रुग्णांचे मृत्यू वेगाने वाढले आहेत. शिवमंदिर येथील स्मशानभूमीत लाकडावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ९ जागा आहेत. त्यामुळे एका वेळी ९ जणांवर विधी होऊ शकतो. अनेक मृतदेहांना तासन् तास वाट पाहावी लागत आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता सहा मृतदेह होते. त्यापैकी चार वेटिंगवर होते. मृतांच्या नातेवाइकांनी सांगितले की, सकाळी ७ वाजता येऊन नंबर लावला आहे. मात्र, दुपारी १ वाजला तरीही सरण तयार नव्हते.

अंत्यसंस्कारांसाठी टोकन पद्धत सुरू करण्यात आली आहे, मात्र त्यात बराच सावळागोंधळ सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात तेथील कर्मचाऱ्यांनी रात्रीपासून दुपारपर्यंत अवघ्या आठ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे सांगितले. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तेथे महापालिका प्रशासनाने लक्ष घालावे, अशी अपेक्षा त्रस्त नातेवाइकांनी केली.

------------

गॅसदाहिन्या बंदच

*पाथर्ली येथील स्मशानभूमीत गॅसदाहिनीची सोय आहे. मात्र ती बंद असल्यामुळे पाथर्ली येथे कोणी गेले नाही. तेथील मृतदेह शिवमंदिर रस्त्यावरील स्मशानात आले. त्यामुळे तेथील ताण आणखी वाढला आहे.

*महापालिकेचे स्मशानभूमी देखभाल अधिकारी शमीम केदार म्हणाले की, त्या दाहिन्या दुरुस्तीसाठी कुर्ला येथून कारागीर बोलावले आहेत. दोन्ही ठिकाणच्या बेल्टमधील बेअरिंग खराब झाल्या आहेत. त्या बेल्टवर कोविड मृतदेहांवरील पीपीई किटचे प्लास्टिक अडकते. आगीत ते जास्त वितळते, त्यामुळे बेल्ट पुढे जात नाही. या तांत्रिक समस्येमुळे दाहिन्या बंद आहेत़ त्या लवकरच सुरू हाेतील.

* शिवमंदिर स्मशानभूमीत लाकडावर अंत्यसंस्कार करण्यासाठी २,५०० रुपयांची पावती फाडायची, डिझेलसाठी ५०० रुपये, ३०० रुपये शेणाच्या गौऱ्या व अन्य सामग्रीसाठी तसेच जे लाकडे रचतात त्यांना मृतांच्या नातेवाइकांच्या इच्छेनुसार द्यावे लागते. त्यामुळे महापालिकेने सुविधा नेमकी कसली दिली, हा सवाल उपस्थित होत आहे.

--------------

वेटिंगवर असलेल्या मृतदेह, स्मशानभूमी असा फोटो आहे