शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

फलक लागले पण दिशा भरकटलेलीच, नियमांच्या अंमलबजावणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 03:07 IST

ठाकुर्लीतील पुलावर सोमवारी घडलेल्या अपघातानंतर जागे झालेल्या केडीएमसी प्रशासनाने मार्गदर्शक फलक तेथे लावले आहेत.

डोंबिवली : ठाकुर्लीतील पुलावर सोमवारी घडलेल्या अपघातानंतर जागे झालेल्या केडीएमसी प्रशासनाने मार्गदर्शक फलक तेथे लावले आहेत. परंतु पुलाच्या परिसरातील रस्त्यांवर फलक अद्याप न लावल्याने तेथे वाहतुककोंडीला चालकांना सामोरे जावे लागत आहे.उड्डाणपूल चढत असताना थ्री व्हीलर टेम्पो कठड्याला धडकल्याची घटना नुकतीच घडली. या अपघातात कठडा तुटून टेम्पो खाली रूळांवर कोसळला असता, तर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेमुळे उशिरा का होईना जाग आलेल्या केडीएमसी प्रशासनाने पुलावर वाहनचालकांसाठी मार्गदर्शक फलक लावले आहेत. ‘कृपया वाहने सावकाश चालवा,’ ‘वेग ताशी ३० कि. मी. ठेवा,’ ‘उड्डाणपुलावर ओव्हरटेक करू नका’ असे फलक लावले आहेत. परंतु, पुलाच्या परिसरातील काही मार्ग एकदिशा केले आहेत. तसेच काहीठिकाणी वाहने उभी करण्यासाठी ‘पी १’ आणि ‘पी २’ असे बदल सूचविले आहेत. महत्त्वाचे म्हणजे काही रस्त्यांवर वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कानविंदे चौक, व्ही. पी. रोड, मंजूनाथ चौक, गुरूमंदिर रोड, छेडा रोड, छत्रपती संभाजी महाराज पथ या भागांमध्ये हे बदल सूचविण्यात आले आहेत. याबाबतचे दिशादर्शक फलक मात्र अद्यापपर्यंत लावलेले नाहीत. त्यामुळे सध्या येथे वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे सकाळ-सायंकाळ पाहावयास मिळत आहे. या उड्डाणपुलावर अवजड वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. परंतु, बिनदिक्कतपणे या वाहनांची येजा सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे.>मोठ्या अपघातानंतर जाग?टेम्पोच्या अपघातानंतरही वाहतूक पोलिसांनी उड्डाणपुलाचे उद्घाटन न झाल्याचा मुद्दा उपस्थित करत वाहतुकीच्या नियोजनाकडे दुर्लक्ष केले आहे. एखादा मोठा अपघात घडल्यानंतर वाहतूक पोलिसांना जाग येणार का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पुलाच्या परिसरातील कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीस आणि वॉर्डन नेमण्याची मागणी होत आहे.