शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका गोलमैदानातील योगाकेंद्रांची पाटी इंग्रजीत, कारवाई शून्य

By सदानंद नाईक | Updated: January 30, 2024 17:52 IST

उल्हासनगर महापालिकेने मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकांना विरोधात आक्रमक भूमिका घेऊन दंडात्मक कारवाई सुरू केली.

उल्हासनगर : शहरातील दुकानावरील मराठी पाट्यावरून महापालिकेने आक्रमक भूमिका घेतली असतांना दुसरीकडे गोलमैदानाच्या महापालिका योगाकेंद्रांची पाटी इंग्रजीत असल्याचे उघड झाले. याबाबत कारवाईचे संकेत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिले असून योगा केंद्राच्या ताब्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 उल्हासनगर महापालिकेने मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकांना विरोधात आक्रमक भूमिका घेऊन दंडात्मक कारवाई सुरू केली. मात्र महापालिका मालकीचे असलेले गोलमैदान येथील योगाकेंद्राचे नामफलक इंग्रजी मध्ये असून त्यावर आमदार कुमार आयलानी यांचा फोटो आहे. गोलमैदान ग्रीन परिक्षेत्रात मोडत असतांनाही मैदानात बांधकामे झाले आहेत. मैदानाचे विभाजन अनेक तुकड्यात करून काही तुकडे भाडेतत्वावर दिले. आमदार कुमार आयलानी यांच्या आमदार निधीतून मैदानाच्या एका बाजूला योगाकेंद्र व त्याशेजारी बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आले. योगाकेंद्र व बॅडमिंटनचा ताबा महापालिकेकडे की अन्य कोणाकडे? असा प्रश्न इंग्रजी पाटीवरून निर्माण झाला. महापालिकेची कोणतीही परवानगी नसतांना दोन्ही केंद्र खाजगी संस्था वापरत असून महापालिका अधिकारी राजकीय दबावाखाली कोणतीही कारवाई करीत नसल्याची टीका होत आहे. 

आमदार कुमार आयलानी महापालिका गोलमैदान येथे आमदार निधीतून नागरिकांसाठी योगाकेंद्र बांधले आहेत. योगाकेंद्रांचा ताबा महापालिका व योगाकेंद्र चालकाकडे असून केंद्रावरील पाटीबाबत कल्पना नाही. 

अशोक नाईकवाडे  (उपायुक्त महापालिका) गोलमैदानात बांधण्यात आलेले योगाकेंद्र महापालिकेच्या मालकीचे असून त्याचा ताबाही महापालिकेकडे आहे. मात्र काहीजण मोफत योगाकेंद्र चालवीत आहेत. 

अनिल खतूरानी  (सहायक आयुक-महापालिका) गोलमैदान येथील योगाकेंद्रांचे नामफलक इंग्रजी मध्ये असून त्या पाठीवर कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. लवकरच केंद्रावर मराठी पाटी लावण्यात येणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर