शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
7
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
8
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
9
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
10
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
11
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
12
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
13
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
14
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
15
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
16
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
17
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
18
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
19
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
20
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...

चिंचोटी-माणकोली रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात गाव विकास समितीचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:43 IST

भिवंडी : भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेविरोधात गाव विकास समितीने बुधवारी खारबाव, कालवार व कामण या ...

भिवंडी : भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेविरोधात गाव विकास समितीने बुधवारी खारबाव, कालवार व कामण या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. महामार्गावरील सुमारे दहा ते बारा गावांतील स्थानिकांनी या आंदोलनात भाग घेतला होता. यामुळे खारबाव परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होऊन सुमारे चार ते पाच किलोमीटरपर्यंत लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

माणकोली-अंजुरफाटा-चिंचोटी या राज्य महामार्गाची सध्या प्रचंड दुरवस्था झाली असून, सध्या हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून नागरिकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रिम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असून, त्यात अनेकांचा जीव गेला आहे.

सुप्रिम कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या रस्त्याबाबत दुर्लक्षित धोरणामुळे स्थानिक गावकऱ्यांनी एकत्र येऊन सर्वपक्षीय गाव विकास संघर्ष समिती स्थापन केली असून, तिच्या वतीने बुधवारी सकाळी ११ वाजता तीन वेगवेगळ्या ठिकाणी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

विशेष म्हणजे रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करा, जोपर्यंत तो दुरुस्त होत नाही तोपर्यंत टोलनाका बंद करा, अपघाती मृत्यू, जखमी व कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या नागरिकांना आर्थिक मदत करा, अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. खारबाव येथे प्रचंड वाहतूककोंडी झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे करून पोलिसांनी आंदोलन स्थगित करण्यासाठी पुढाकार घेतल्याने आंदोलकांनी दीड तास रोखून धरलेला रस्ता सुरळीत केला.

* सुप्रिम कंपनीसह सा. बां.विरोधात संताप

पूर्वनियोजित असलेल्या या आंदोलनाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबरच टोल वसूल करणाऱ्या सुप्रिम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व टोल प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करून पोलिसांसमोर आपला राग व संताप व्यक्त केला.