शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी बसेसना आरटीओचा आशीर्वाद : टीएमटीच्या बैठकीत प्रशासनाचा आरोप  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 06:18 IST

ठाणे परिवहन सेवेत सुधारणा झाल्यानंतर खाजगी बस बंद होतील असा दावा प्रशासनाकडून केला जात होता. परंतु, अवस्था सुधारल्यानंतरही खाजगी बसवर कारवाई का होत नाही, त्यांना पाठबळ कोणाचे मिळत आहे, असे अनेक सवाल करून परिवहन समितीच्या बैठकीत विरोधकांनी या बसवर कारवाईची मागणी केली.

ठाणे : ठाणे परिवहन सेवेत सुधारणा झाल्यानंतर खाजगी बस बंद होतील असा दावा प्रशासनाकडून केला जात होता. परंतु, अवस्था सुधारल्यानंतरही खाजगी बसवर कारवाई का होत नाही, त्यांना पाठबळ कोणाचे मिळत आहे, असे अनेक सवाल करून परिवहन समितीच्या बैठकीत विरोधकांनी या बसवर कारवाईची मागणी केली. प्रशासन कारवाई करण्यास तयार आहे, परंतु, आरटीओकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याने ती करणे शक्य होत नसल्याचे परिवहन प्रशासनाने व्यक्त केले. असे असले तरी एका आठवड्याच्या आत आरटीओ आणि परिवहन संयुक्त पाहणी करूनही कारवाई करण्याचे आश्वासन प्रभारी व्यवस्थापक संदीप माळवी यांनी दिले.टीएमटीच्या उडालेल्या बोजवाºयाचा फायदा घेऊन मागील कित्येक वर्षांपासून खाजगी बसचालकांनी आपला धंदा घोडबंदर मार्गावर तेजीत सुरु केला. यामध्ये आरटीओसह वाहतूक पोलिसांचेही त्यांनी बांधून घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून फारशीा कारवाई होतांना दिसत नाही. काही महिन्यांपूर्वी कोपरीतील रहिवाशांनीच रस्त्यावर उतरुन या बसेस विरुद्ध एल्गार पुकारला होता. त्यानंतर काही दिवस त्या बंद होत्या. परंतु, पुन्हा त्यांनी नौपाड्यात शिरकाव केला. काही बस, गावदेवी तर काही नौपाड्यातून सुटू लागल्या होत्या. काही दिवसानंतर, वातावरण शांत झाल्यानंतर त्यांनी वेग पकडण्यास सुरवात केली आहे.दरम्यान, परिवहनचा कारभार सुधारल्यानंतर त्या बंद होतील असा दावा परिवहन प्रशासनाने केला होता. परंतु, आज परिवहनचा कारभार बºयापैकी सुधारला आहे. टप्प्याटप्प्याने बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होत आहेत, इलेक्ट्रीक, इथेनॉल, तेजस्वीनी अशा अनेक बस दाखल होणार आहेत. त्यामुळे परिवहनचा कारभार नक्कीच सुधारण्यास मदत होणार आहे. असे असतांनादेखील खाजगी बसवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल काँगे्रसचे सदस्य सचिन शिंदे यांनी केला. त्याला शिवसेनेचे राजेश मोरे यांनी देखील पाठिंबा देऊन मागील महिन्यात यावर चर्चा झाली होती. परंतु, अद्यापही कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली.आरटीओकडून पत्राला प्रतिसाद नाहीखासगी बसवर कारवाई व्हावी यासाठी प्रशासनाकडून आरटीओला पत्र व्यवहार केला आहे. परंतु, त्यांच्याकडून अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे संबधींत विभागाच्या अधिकाºयांशी भेट घेऊन पुढील आठवड्यात संयुक्तपणे पाहणी करून या बसवर कारवाई करण्याचे आश्वासन माळवी यांनी दिले.