शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अनुराग ठाकूर यांच्या कल्याण दौऱ्यानिमित्त भाजपाचं शक्तिप्रदर्शन

By अजित मांडके | Updated: February 14, 2023 13:45 IST

ठाणे : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या कल्याण लोकसभा प्रवासाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने सुद्धा कळवा मुंब्र्यात  शक्ती प्रदर्शन ...

ठाणे :

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या कल्याण लोकसभा प्रवासाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने सुद्धा कळवा मुंब्र्यात  शक्ती प्रदर्शन केलं. 2024 लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने केंद्रीय मंत्र्यांचे विविध लोकसभा मतदार संघातील प्रवासाचे कार्यक्रम आखले आहेत.. त्याच अनुषंगाने कल्याण लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा हा दुसरा दौरा आहे.

सध्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खासदार म्हणून निवडून गेले आहेत. आज सकाळी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली.यावेळी भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या जितुद्दीन ला या महाराष्ट्रात थारा नाही त्याच्या विरोधात राग दाखवण्यासाठीच ही प्रचंड गर्दी जमल्याच प्रवीण दरेकर यांनी आपल्या भाषणात म्हटलं. तर 2024 मध्ये सुद्धा विक्रमी मतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा भारताच्या पंतप्रधानपदी निवडून येतील आणि महाराष्ट्रात सुद्धा भारतीय जनता पक्षाला विक्रमी जागा मिळतील असा विश्वास केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.कळवा येथे स्वागत झाल्यानंतर ते पुढील प्रवासासाठी कल्याण ग्रामीण लोकसभा मतदारसंघांमध्ये रवाना झालेत..