शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांच्या लसीकरणावर भाजपची पोस्टरबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:53 IST

ठाणे : एकीकडे महापौर नरेश म्हस्के यांनी घेतलेल्या कोरोना लसीवरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपने आता त्याचे ...

ठाणे : एकीकडे महापौर नरेश म्हस्के यांनी घेतलेल्या कोरोना लसीवरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपने आता त्याचे भांडवल करून शहरभर पोस्टरबाजीतून महापौरांवर टीका केली आहे. कोरोनायोद्ध्यांना लस देणे गरजेचे असताना महापौरांचे लाड कशासाठी, असा सवाल या पोस्टरद्वारे केला आहे. दुसरीकडे एका डॉक्टरला मुदत संपल्याचे सांगून लस न देता पिटाळून लावल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आल्याने भाजपच्या हातात आयतेच कोलीत मिळाले आहे.

कोरोनाच्या काळात झोकून देऊन कार्य न करता ठाणेकरांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महापौर नरेश म्हस्के यांनी नियम डावलून स्वत: कोरोना लस घेतली. त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी घेतलेली लस म्हणजे सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोप भाजपने केला आहे. लस पूर्णपणे सुरक्षित आहे हे सर्वांना समजण्याकरिता ती घेतली असल्याचा महापौरांचा दावा आहे. मात्र, याबाबत सरकारी आदेश दाखवणार का, असा सवाल करून भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी थेट केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांना पत्र पाठवून या गैरप्रकाराकडे लक्ष वेधले आहे. तसेच ठाणे शहराला पुरवठा केलेली लस सत्तेचा गैरवापर करून आणखी कोणाला दिली आहे का, नक्की किती फ्रंटलाइन वर्कर्सना ती मिळाली, याची चौकशीची मागणी केली आहे. भाजप एवढ्यावरच थांबला नसून त्याने आता ठाण्यात पोस्टरबाजी करून महापौरांवर हल्लाबोल केला आहे.

महापौरांवर हल्लाबोल करणारे हे पोस्टर महापालिका मुख्यालयासमोरच लावल्याने अनेकांच्या नजरा त्यावर खिळल्या होत्या. कोरोनायोद्धे ठाण्याचा अभिमान, त्यांना सर्वप्रथम लस मिळणे हा त्यांचा अधिकार, सेना आमदार, महापौरांनी लाइनीत घुसून त्यांचा केला अपमान अशा आशयाचा मजकूर या पोस्टरवर आहे. शिवसेना -राष्ट्रवादी भाऊ भाऊ, दोघे मिळून जनतेच्या पैशांवर मजा मारू, असा आशयही पोस्टर झळकत आहे.