शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘शून्य कचरा’साठी भाजपाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:41 IST

केडीएमसी हद्दीत शून्य कचरा मोहीम राबवण्यासाठी भाजपाच्या महिला आघाडीने पुढाकार घेतला आहे. कचऱ्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पदाधिकाºयांच्या शिष्टमंडळाने सोमवारी आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली.

कल्याण : केडीएमसी हद्दीत शून्य कचरा मोहीम राबवण्यासाठी भाजपाच्या महिला आघाडीने पुढाकार घेतला आहे. कचऱ्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पदाधिकाºयांच्या शिष्टमंडळाने सोमवारी आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली.भाजपाच्या ठाणे-पालघर महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ. शुभा पाध्ये, पदाधिकारी संगीता गुंजाळ, निर्मला कदम, रसिका पाटील, ममता परमार, वैशाली ठोसर, सारिका काळे, तृप्ती मोरे, वासंती कुलकर्णी, जया सोनावणे आदी या शिष्टमंडळात होत्या.कल्याण-डोंबिवलीत कचरा, अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. स्वच्छता राखण्यास महापालिकेला वारंवार अपयश येत आहे. नागरिकांकडून महापालिका विविध प्रकारचे कर वसूल करते. असे असतानाही त्यांनाच कचºयाची विल्हेवाट लावण्याची सक्ती केली जात आहे. परंतु, त्यासाठी प्रशिक्षण व सोयीसुविधा पुरवा, खत कचरा प्रकल्पासाठी सोसायटीच्या आवारात चेंबर बांधा, त्यासाठी शेड उभारण्यासाठी महापालिकेने हातभार लावावा, अशा मागण्या शिष्टमंडळाने केल्या.शून्य कचरा मोहीम राबवण्यासाठी सोसायट्या पुढाकार घेणार असतील, तर या मागण्यांचा विचार केला जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी या वेळी दिले. ही मोहीम राबवण्यास इच्छुक असलेल्या सोसायट्यांनी तशा स्वरूपाचे प्रस्ताव तयार करून महापालिकेकडे द्यावेत, असेही प्रशासनाने या वेळी सांगितले.कचरा, डेब्रिज, टपºया हटवल्यास्वच्छ कल्याण-डोंबिवली मोहिमेंतर्गत कल्याण-शीळ रस्त्यावरील काटईपर्यंत स्वच्छता करण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा असलेला कचरा व डेब्रिज उचलण्यात आले. प्रभाग क्षेत्र अधिकाºयांनी रस्त्यालगत बेकायदा बांधलेल्या ४५ शेड, ४० टपºया, २३ गॅरेज तसेच बेकायदा बॅनर हटवले. रस्त्यालगत डेब्रिज टाकणाºयांकडून मंगळवारच्या कारवाईत तीन हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. या मोहिमेसाठी आठ डम्पर, तीन जेसीबी, सहा घंटागाड्या, १०० कामगार लावले होते. ५० टन डेब्रिज, ७५ टन अतिरिक्त कचरा यावेळी उचलण्यात आला. या वेळी महापौर विनीता राणे तसेच आरोग्य अधिकारी विलास जोशी उपस्थित होते.वाहने हलवारस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या गाड्या संबंधित मालक, गॅरेजचालक यांनी बुधवार, २९ मेपर्यंत तेथून हलवाव्यात. अन्यथा, ही वाहने महापालिका, वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या संयुक्त कारवाईदरम्यान उचलली जातील, असा इशारा केडीएमसीने दिला आहे.