शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला निवडल्याची भोगा फळे

By admin | Updated: May 1, 2017 06:22 IST

डोंबिवलीत गेल्यावर्षी झालेल्या प्रोबेस कंपनीतील स्फोट प्रकरणात मालमत्तेचे नुकसान झालेल्या नागरिकांना राज्य सरकारकडून अद्याप

डोंबिवली : डोंबिवलीत गेल्यावर्षी झालेल्या प्रोबेस कंपनीतील स्फोट प्रकरणात मालमत्तेचे नुकसान झालेल्या नागरिकांना राज्य सरकारकडून अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यासाठी लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ती मिळवून देऊ, असे आश्वासन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी दिले. मात्र ते देतानाच ‘भाजपाला निवडून दिलेत, भोगा आता आपल्या कर्माची फळे,’ अशा शब्दांत त्यांनी नागरिकांना फटकारले. नुकसान झालेल्या नागरिकांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. तेव्हा ते बोलत होते. राज ठाकरे एका खाजगी कार्यक्रमानिमित्त रविवारी डोंबिवलीत आले होते. अरुण भोसले यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतल्यावर राज यांनी एंकदर प्रकरण समजून गेतले. भरपाईचा मुद्दा कशामुळे अडला आहे, त्याची माहिती घेतली. नंतर मात्र त्यांनी शिष्टमंडळाशी बोलताना मनसेला निवडून न दिल्याबद्दल त्रागा केला. भाजपाला निवडून दिलेत ना, भोगा आता कर्माची फळे, अशा शब्दांत त्यांनी शिष्टमंडळातील सदस्यांना फटकारले. मुख्यमंत्री हे थापामंत्री आहेत, तरीही तुमच्यासाठी मी त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे नुकसानभरपाईचा प्रश्न मांडणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. या प्रसंगी मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील, उपाध्यक्ष राजेश कदम, शहराध्यक्ष मनोज घरत, गटनेते मंदार हळबे आदी उपस्थित होते. प्रोबेस कंपनीत गेल्यावर्षी २६ मे रोजी स्फोट झाला होता. त्यात १२ जण मृत्युमुखी पडले. या स्फोटामुळे दोन हजार ६६४ मालमत्तांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे कल्याण तहसील कार्यालयाकडून करण्यात आले. सात कोटी ४३ लाख रुपये नुकसान भरपाईपोटी नागरिकांना देण्यासाठी हे पंचनामे केले गेले असले, तरी मुख्यमंत्र्यांच्या निधीतून ही नुकसानभरपाईची रक्कम दिली गेलेली नाही. त्यासाठी मनसेने नागरिकांकडून माहिती मागविली आहे. त्यांचे एक निवेदन पुन्हा कल्याणच्या तहसीलदारांना दिले जाणार आहे. येत्या २६ मेच्या आत म्हणजेच दुर्घटनेला वर्ष पूर्ण होण्याच्या आत भरपाई दिली गेली नाही. तर मनसेच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेने यापूर्वीच दिला आहे. (प्रतिनिधी)