शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

‘टीएमटी’साठी सेनेची प्रतिष्ठा पणाला, भाजपा प्रथमच रिंगणात, राव यांच्या पॅनेलचेही आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 03:44 IST

ठाणे : विविध अडथळ्यांची शर्यत पार करत तब्बल १२ वर्षांनंतर ठाणे परिवहन सेवेच्या मान्यताप्राप्त टीएमटी एम्प्लॉईज युनियनची निवडणूक लागली आहे.

ठाणे : विविध अडथळ्यांची शर्यत पार करत तब्बल १२ वर्षांनंतर ठाणे परिवहन सेवेच्या मान्यताप्राप्त टीएमटी एम्प्लॉईज युनियनची निवडणूक लागली आहे. भाजपाने प्रथमच या निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात आपले पॅनल उभे केले आहे. शरद राव प्रगती पॅनलही निवडणुकीत असल्याने सेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.ठाणे परिवहनची सेवा १९८९ च्या सुमारास सुरू झाली. त्यानंतर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली या परिवहन सेवेत टीएमटी एम्प्लॉईज युनियनची स्थापना करण्यात आली. ही मान्यताप्राप्त युनियन असून, त्यावर १९९०-९१ च्या सुमारास धर्मवीर पॅनलने कब्जा केला होता. या युनियनचे सल्लागार म्हणून आनंद दिघे आणि पहिले अध्यक्ष होण्याचा मान विलास सामंत यांना मिळाला. नंतर, देवीदास चाळके आणि नंतर शिवसेनेच्या विविध पदाधिकाºयांचाच वरचष्मा दिसून आला; परंतु सुमारे १२ वर्षांपूर्वी शिवसेनेला या ठिकाणी जबरदस्त हादरा बसला. शरद राव यांच्या प्रगती पॅनलने प्रथमच या युनियनवर कब्जा केला; परंतु संपूर्ण कब्जा मिळविता आला नाही. त्यामुळे परिवहनवरील आपली ताकद कमी न करण्यासाठी शिवसनेने येथे निवडणूक न घेण्यासाठी जोर लावला होता. प्रत्यक्षात दर पाच वर्षांनी ही निवडणूक होणे अपेक्षित होते. तसेच या निवडणुकीत परिवहनमधीलच कर्मचारी निवडणूक लढविणे अपेक्षित होते. परंतु शिवसेनेने नगरसेवक आणि पदाधिकाºयांना या युनियनचे पदाधिकारी केल्याने हा देखील एक वादाचा मुद्दा झाला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेले. यामध्ये कामगारांनीच स्वत: लढा देत, कामगारांच्या हितासाठी युनियनची निवडणूक होणे अपेक्षित होते, अशी बाजू त्यांनी मांडून धरली आणि अखेर न्यायालयाने कामगारांच्या बाजूने कौल देत निवडणुकीसाठी हिरवा कंदील दाखविला. याला स्थगिती मिळविण्यासाठी देखील शिवसेना न्यायालयात गेली होती. परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली.अखेर तब्बल १२ वर्षानंतर ठाणे परिवहन सेवेत टीएमटी एम्पलॉईज युनियनची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत तीनही पॅनलमधून प्रथमच कामगार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.या निवडणुकीत शिवसेनेशी फारकत घेतलेल्या भाजपाने आपले विकास पॅनल प्रथमच उतरविले आहे. त्यांचे ३७ पैकी ३० उमेदवार रिंगणात आहेत. तर त्यांचे नेतृत्व भाजपा माथाडी कामगार संघटनेचे नेते शिवाजी पाटील हे करीत आहेत. शिवसेनेच्या धर्मवीर पॅनलची जबाबदारी परिवहन समितीचे सभापती अनिल भोर यांच्या खांद्यावर टाकण्यात आली असून, त्यांचे ३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शरद राव प्रगती पॅनलची जबाबदारी रवि राव यांच्या खांद्यावर असून, त्यांचे २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपाने प्रचारासाठी आमदार, सर्व नगरसेवकांची फळी या निवडणुकीसाठी प्रचारात उतरविली आहे. शिवसेनेनेदेखील पालकमंत्र्यांसह इतर मंडळी प्रचारात उतविली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.>२८ आॅक्टोबरला निवडणूक प्रक्रिया एनकेटी कॉलेजमध्ये पार पडेल. त्याच दिवशी या निवडणुकीचा निकाल हाती पडणार आहे. त्यामुळे टीएमटीचा कोण कब्जा घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :thaneठाणे