शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज माघारीतही झाले भाजपाच्या कोंडीचेच प्रयत्न

By admin | Updated: May 10, 2017 00:01 IST

सत्तेसाठी वेगवेगळ््या पक्षांतील गट फोडण्याचे प्रयत्न भाजपाने उमेदवारी देण्यापूर्वी केल्याने सर्व विरोधक एकत्र आले असून अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : सत्तेसाठी वेगवेगळ््या पक्षांतील गट फोडण्याचे प्रयत्न भाजपाने उमेदवारी देण्यापूर्वी केल्याने सर्व विरोधक एकत्र आले असून अर्ज माघारी घेईपर्यंत जेथे जमेल तेथे भाजपाविरोधात एकास एक उमेदवार देण्याच्या किंवा लढत कडवी होईल यादृष्टीने आखणीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भिवंडीच्या राजकारणात स्वतंत्र आघाडी करण्याचे भाजपाचे प्रयत्न फसले असले, तरी त्यांनी कोणार्कशी समझोता केला. पण काँग्रेसचा एक गट, सेनेचे काही कार्यकर्ते, समाजवादी आणि राष्ट्रवादीमधील नाराजांना गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपाने करून पाहिला. पण त्याला पुरेसे यश आले नाही. काँग्रेसमधील जो गट फुटण्याच्या प्रयत्नात होता, त्यालाच उमेदवारीत प्राधान्य दिल्याने काँग्रेसमधील संभाव्य फूट टळली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातल्याने शिवसेनेतील नाराजांची त्यांच्या पद्धतीने समजूत काढण्यात आली. समाजवादी पक्ष, राष्ट्रवादीतही फुटीरांची चाचपणी झाली होती. पण या पक्षांनीही आपापल्या परीने बंड रोखण्यात यश मिळवले. आता हे सर्व पक्ष भाजपाविरोधात एकत्र आले आहेत. त्यातही कोणार्क आघाडीला पक्षातूनच असलेल्या विरोधामुळे भाजपाची पुरती कोंडी झाली आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्ष-राष्ट्रवादीची आघाडी वेगळी असली, तरी त्यांनीही अर्ज माघारीपर्यंत काही जागांवर माघार घेत भाजपा-कोणार्कच्या कोंडीसाठी चर्चा सुरू केल्याचे समजते. विरोधकांची संख्या वाढली, तर मतांची फाटाफूट होईल आणि त्याचा फायदा भाजपाला होईल, हे गृहीत धरून गुरूवारच्या माघारीपर्यंत भाजपाविरोध अधिक कडवा करण्यासाठी विरोधकांची एकजूट झाली आहे. भिवंडीची संघर्ष यात्रामुंबई, ठाणे, उल्हासनगरच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाने फक्त उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबाच्या मदतीने सत्ता राखली. आताही पनवेलमध्ये भाजपाची स्थिती तुलनेत चांगली असल्याचा त्या पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे. पण भिवंडीत तो पक्ष खूपच कमकुवत आहे. तुलनेने काँग्रेस, समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना यांची स्थिती चांगली असून हे सर्व पक्ष भाजपाविरोधासाठी परस्परांच्या संपर्कात आले आहेत.