शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

भाजपाने पालघर चिटिंग करून जिंकले- आदित्य ठाकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 05:15 IST

पालघर पोटनिवडणुकीत भाजपाने चिटिंग केल्याने शिवसेना हरली. प्रत्यक्षात शिवसेना जिंकली आहे, अशी टीका शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केली.

ठाणे : पालघर पोटनिवडणुकीत भाजपाने चिटिंग केल्याने शिवसेना हरली. प्रत्यक्षात शिवसेना जिंकली आहे, अशी टीका शिवसेना नेतेतथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केली. पालघरच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीन होते, म्हणून भाजपा जिंकली. परंतु, सिनेटच्या निवडणुकीत आणिआता कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बॅलेट पेपर असल्याने ही निवडणूक शिवसेना जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला.कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने संजय मोरे निवडणूक लढवत असून त्यांच्या प्रचारासाठी सोमवारी ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांचा मार्गदर्शन मेळावा रेमण्ड हॉल येथे आयोजित केला होता. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, गोपाळ लांडगे, प्रकाश पाटील, युवासेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते. जेव्हा शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढल्या, तेव्हा आपण जिंकलो आहोत. पालघरमध्येही खरेतर आपण जिंकलो आहोत. मात्र, ईव्हीएमने भाजपाच्या पदरात यशाचे माप टाकले. भाजपाच्या ‘चुनावी जुमल्या’विषयी बोलण्याचा आता कंटाळा आला असून दोन कोटी रोजगार देण्यावरही आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही. उलट, नोटाबंदीमुळे ४० लाख रोजगार गेले, अशी टीका त्यांनी केली.आजच्या शिक्षणामुळे रोजगार मिळेल का, स्वयंरोजगार करता येईल का, याची खात्री तरुणांना राहिलेली नाही. त्यामुळेच शिवसेना शिक्षण क्षेत्रात मूलभूत काम करत आहे. मुंबई विद्यापीठातील गोंधळाकरिता शिवसेनेमुळेच कुलगुरूंना राजीनामा द्यावा लागला, हे आपले मोठे यश आहे, असेही ते म्हणाले.शिवसैनिक पेटून उठला की काय होते, ते सिनेटच्या १० पैकी १० जागा जिंकून आपण दाखवले. त्यामुळेच विधान परिषदेच्याही अधिकाधिक जागा जिंकण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.