शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात स्वबळासाठी भाजपची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:17 IST

इच्छुकांची गर्दी : सेनेच्या मतदारसंघात तयारी

ठाणे : एकीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून कोल्डवॉर सुरू असताना दुसरीकडे भाजपने मात्र हे निमित्त पुढे करून स्वबळाची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून यामध्ये अनेकांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे येत्या काळात युती झाली नाही तर आम्ही स्वबळावर लढण्यास सक्षम आहोत, असा इशारा भाजपने या निमित्ताने दिला आहे.

सोमवारी दुपार नंतर भाजपच्या ठाण्यातील खोपट येथील कार्यालयात कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. युतीतील अलिकडच्या घडामोडींवरुन जागा वाटपांबाबत रस्सीखेच दिसते. त्यातच भाजपने चारही मतदार संघासाठी मुलाखती घेऊन स्वबळाचा नारा मजबुत केल्याची चर्चा आहे.ठाणे शहर मतदारसंघातून विद्यमान आमदार संजय केळकर, नारायण पवार, संदीप लेले, संजय वाघुले, डॉ. राजेश मढवी, मिलिंद पाटणकर, सुरेश कोलते यांनी मुलाखती दिल्या. ओवळा-माजिवडा मतदारसंघातून मनोहर डुंबरे, सीताराम राणे, अर्चना मणेरा, मुकेश मोकाशी, शेर बहादुर सिंग, शिवाजी पाटील यांनी तर कळवा मुंब्रा मतदारसंघातून हर्षला बुबेरा, रिदा राशीद, मनोहर सुखदरे यांनी तयारी दर्शविली. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून भरत चव्हाण आणि समीरा भारती यांनी मुलाखती दिल्या.लेले यांचे टोचले कानएकीकडे स्वबळाची तयारी सुरू असतांना ठाण्यात मात्र, बुथ लेव्हलच्या पदाधिकाऱ्यांची अद्याप बांधणी झालेली नाही, पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही, संघटन बांधणी झालेली नसल्याच्या मुद्यावरून कामगार मंत्री कुटे यांनी शहर अध्यक्ष संदीप लेले यांचे चांगलेच कान टोचले.