शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

नरेंद्र पवार यांना भाजपचा पाठिंबा?, युतीमध्ये बेबनाव निर्माण होण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 05:35 IST

एकाच जिल्ह्यातील दोन बंडखोरांबाबत हा दुजाभाव कशाकरिता, असा सवाल कल्याण पश्चिममधील शिवसैनिक करीत असून पवार यांच्या बंडाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा छुपा पाठिंबा तर नाही ना, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.

ठाणे : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विश्वनाथ भोईर यांच्याविरोधात बंडखोरी करणारे भाजपचे विद्यमान आ. नरेंद्र पवार यांच्यावर पक्षाने हकालपट्टीची कारवाई केलेली नाही. मात्र, त्याचवेळी मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विद्यमान आ. नरेंद्र मेहता यांच्याविरोधात बंडखोरी करणाऱ्या माजी महापौर गीता जैन यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. एकाच जिल्ह्यातील दोन बंडखोरांबाबत हा दुजाभाव कशाकरिता, असा सवाल कल्याण पश्चिममधील शिवसैनिक करीत असून पवार यांच्या बंडाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा छुपा पाठिंबा तर नाही ना, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.भाजपचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करून निवडणूक लढवणाºया चार जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामध्ये चरण वाघमारे (तुमसर), गीता जैन (मीरा-भार्इंदर), बाळासाहेब ओव्हाळ (पिंपरी-चिंचवड) व दिलीप देशमुख (अहमदपूर, लातूर) यांचा समावेश आहे. जैन यांच्याप्रमाणेच पक्षादेश धाब्यावर बसवून पवार यांनी बंड केले. मात्र, त्यांच्यावर कारवाई झालेली नसल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.कल्याण पश्चिम मतदारसंघ भाजपने वाटाघाटीत शिवसेनेला सोडला. त्यामुळे पवार यांच्या राजकीय आशाआकांक्षांवर बोळा फिरला. त्यामुळे त्यांनी बंड केले. त्याचवेळी कल्याण पूर्व मतदारसंघाची मागणी तेथील शिवसैनिक करीत होते व ती मान्य न झाल्याने उल्हासनगर महापालिकेतील विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी बंड केले. या दोन्ही बंडांनी अगोदरच युतीमध्ये अविश्वास निर्माण झाला आहे. बोडारे यांनी माघार घेतली नाही म्हणून पवार यांनी माघार घेतली नाही, असे भाजपचे कार्यकर्ते खासगीत सांगत आहेत, तर पवार यांनी बंड केल्याने नाइलाजास्तव बोडारे यांनी अर्ज दाखल केल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. वाटाघाटीत एखादा मतदारसंघ सोडायचा व नंतर तेथे बंडखोराला अर्ज भरण्यास भाग पाडून ताटात वाढलेले हळूच काढून घ्यायचे, असा हा प्रकार असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. कल्याण पूर्वेतील शिवसैनिक तर एवढे आक्रमक झाले आहेत की, त्यांनी नगरसेवकपदाचे राजीनामे दिले आहेत. पक्षावरील दबाव वाढवण्याकरिता ही खेळी असून या खेळीचा फरक पडणार नाही, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे मत आहे. अर्थात, भाजपच्या कार्यकर्त्यांना हे मान्य नाही. सेनेच्या वरिष्ठ नेत्यांचीच बोडारे यांच्या बंडाला फूस असल्याचे त्यांचे मत आहे.विधानसभा निवडणूक असल्याने भाजप व शिवसेनेचे वरिष्ठ नेते महायुतीमध्ये ठाणे जिल्ह्यात सर्व आलबेल असल्याचे भासवत असले, तरी प्रत्यक्षात या दोन्ही मतदारसंघांतील बंडखोरीमुळे युतीच्या मधुर संबंधात मिठाचा खडा पडला आहे. दोन्ही किंवा एका मतदारसंघात जर बंडखोर विजयी झाला, तर भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची व परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची दाट शक्यता दिसत आहे.नरेंद्र पवार यांच्यावर कारवाई का झाली नाही, ते मला माहीत नाही. कल्याण पूर्व व पश्चिम या दोन्ही मतदारसंघांतील बंडखोरांना माघार घेण्यास दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाने सांगितले होते. आता या दोन्ही मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याबाबतचा संयुक्त निर्णय दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाकडून घेतला जाईल. त्यानंतर, पुढील निर्णय होतील.- रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री व भाजप नेते

टॅग्स :kalyan-west-acकल्याण पश्चिम