शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा, शिवसेना दुटप्पी : मनसे, पीआरपीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 05:40 IST

शिवसेना आमदार व भाजपा महापौरांच्या तक्रारीनंतर निविदाविना साडेचार कोटीचा दिलेले कंत्राट आयुक्तांनी अखेर नाममंजूर केले. स्थायी समिती बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी कंत्राटाला मंजुरी दिल्यावर शिवसेना व भाजपाच्या आमदार व महापौरांनी विरोधाची भूमिका घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शिवसेना आमदार व भाजपा महापौरांच्या तक्रारीनंतर निविदाविना साडेचार कोटीचा दिलेले कंत्राट आयुक्तांनी अखेर नाममंजूर केले. स्थायी समिती बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी कंत्राटाला मंजुरी दिल्यावर शिवसेना व भाजपाच्या आमदार व महापौरांनी विरोधाची भूमिका घेतली. भाजप व सेनेने दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप मनसे व पीआरपीने केला आहे.पालिकेच्या स्थायी समिती सभापती भाजपा आघाडीतील साई पक्षाकडे आहे. रस्त्यातील खड्डे गणेश, चालीया व नवरात्रोत्सवापूर्वी भरण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समिती समोर आला. खड्डे भरण्याची निविदा काढल्यास एक महिन्याचा कालावधी जाणार असल्याचे कारण पुढे करत अत्यावश्यक कामाच्या खाली तब्बल साडेचार कोटीचे कंत्राट विनानिविदा जयभारत व पी. अँड झा कंपनीला दिले.विनानिविदा कंत्राट दिल्याने स्थायी समिती व सर्वपक्षीय नगरसेवकांवर टीकेची झोड उठली. कंत्राटात टक्केवारी झाल्याचा आरोप मनसेसह पीआरपी पक्षाने केला. स्थायी समितीमध्ये भाजपाचे ६, शिवसेनेचे ६, साई पक्षाचे ३ व राष्ट्रवादी पक्षाचा १ असे एकूण १६ सदस्य आहेत. त्यांनी सर्वसंमती कंत्राटाला मंजुरी दिल्यानंतर महापौर मीना आयलानी, शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांनी विरोध केला.विनानिविदा दिलेला साडेचार कोटीच्या खड्डे भरण्याच्या कंत्राटामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष प्रदीप गोडसे, सचिन कदम, पीआरपीचे गटनेते प्रमोद टाले यांनी केल्यावर महापौर व आमदारांनी कंत्राट रद्द करण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्याकडे केली. आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मंगळवारी सायंकाळी कंत्राटदार व शहर अभियंता राम जैस्वाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश शितलानी यांच्यासह संबंधित अधिकाºयांशी चर्चा केली. त्यानंतर स्थायी समितीचा कंत्राट देण्याचा प्रस्ताव फेटाळला. आयुक्त निंबाळकर यांनी शहर अभियंता राम जैस्वाल, शितलानी यांना नवीन फेरनिविदा काढण्याचे आदेश दिले.विरोध का केला?महापौर मीना आयलानी व आमदार बालाजी किणीकर यांनी स्वपक्षीय नगरसेवकांनी कंत्राटाला मान्यता दिल्यावर त्यांनी विरोध का केला? असा प्रश्न निर्माण होत आहे.यापूर्वी शिवसेना - भाजपाने खड्डे भरण्यासह कोट्यवधीचे कंत्राट, निविदा विनापरवाने दिल्याचे आरोप मनसेने केला.