शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘भाजपा रा. स्व. संघाला अजिबात जुमानत नाही’

By admin | Updated: July 26, 2016 04:47 IST

रा. स्व. संघ सांगेल ते भारतीय जनता पार्टी ऐकते हे देशातील प्रसारमाध्यमांनी दाखवलेले चित्र असले तरी ते व्यवहार्य नाही, असे वक्तव्य संघाचे प्रसिद्धीप्रमुख प्रमोद बापट यांनी करीत सत्ताधारी

बदलापूर : रा. स्व. संघ सांगेल ते भारतीय जनता पार्टी ऐकते हे देशातील प्रसारमाध्यमांनी दाखवलेले चित्र असले तरी ते व्यवहार्य नाही, असे वक्तव्य संघाचे प्रसिद्धीप्रमुख प्रमोद बापट यांनी करीत सत्ताधारी भाजपा संघाला जुमानत नसल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे संघाचे स्वयंसेवक असल्याने संघाच्या कार्यक्रमांना आणि कार्यालयाला भेटी देतात. मात्र याचा अर्थ भाजपाचा संघाशी संबंध आहे, असा होत नाही, असा जुना सूर बापट यांनी आळवला. देशात आणि काही राज्यांमध्ये भाजपाची सरकारने आल्यापासून प्रसारमाध्यमांनी संघाकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली, असेही ते म्हणाले.संघाची प्रतिमा लोकांपर्यंत नेणारराष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लवकरच नव्वद वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने संघाचे काम आणि त्याचा खरा चेहरा, खरी प्रतिमा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही बापट यांनी सांगितले. केंद्र व राज्यातील भाजपा सरकारमधील अनेक मंत्री भ्रष्टाचार व बेलगाम वक्तव्यामुळे अडचणीत आल्याने संघाने आपला त्याच्याशी दूरान्वये संबंध नसल्याचे भासवण्याची मोहीम हाती घेतल्याचे बोलले जात आहे.बदलापूरच्या आदर्श शाळेत रा. स्व. संघातर्फे शहरातील ज्येष्ठ नागरिक, साहित्यिक, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी बापट यांनी संवाद साधला. या कार्यक्र माला बदलापूरचे उपनगराध्यक्ष श्रीधर पाटील, शाम जोशी आणि विविध ठिकाणांहून आलेले संघाचे व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.