शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मजूर फेडरेशनच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदी भाजपाची सरशी

By admin | Updated: August 3, 2015 03:46 IST

ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीतील सहकार पॅनलव्दारे २१ पैकी १४ जागा जिंकून बहुमत मिळविल्याचा गवगवा करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते

ठाणे : ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीतील सहकार पॅनलव्दारे २१ पैकी १४ जागा जिंकून बहुमत मिळविल्याचा गवगवा करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते या फेडरेशनच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील अपयशामुळे चांगलेच तोंडघशी पडले आहेत. या पदांसाठी निवडून आलेल्या संचालकांनी शनिवारी भारतीय जनता पार्टी (भाजपा) पुरस्कृत सुधाकर म्हात्रे संपदा पाटील यांना मतदान केल्याने ते अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत. भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सहकार पॅनलने या जिल्हा मजूर सहकारी संस्थेच्या संघावर (मजूर फेडरेशन) सत्ता प्राप्त केली. मात्र, अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्ही पदे आपल्याकडे ठेवून भाजपाने निर्विवादपणे सत्ता हस्तगत केली आहे. यासाठी भाजपाचे खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष दशरथ तिवरे येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी सकाळपासूनच तळ ठोकून होते. यामुळे कोणत्याही संचालकास अन्यत्र जाण्याची संधी मिळाली नसल्याचे तिवरे यांनी सांगितले. या फेडरेशनच्या २१ पैकी १४ संचालकांना निवडूून आणणाऱ्या सहकार पॅनलची मजूर संघावर सत्ता राहणार असल्याचे निश्चित झाले होते. मोठ्या तोऱ्याने या विजयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र मजूर फेडरेशनची सत्ता स्वत:हून भाजपाच्या हवाली करावी लागल्याचे उघड झाले आहे.