शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास भाजपचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:41 IST

भाईंदर : मीरा भाईंदर महापालिकेने महामार्गाजवळच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ ३० फूट उंचीचा पुतळा उभारण्याच्या निविदा मंजुरीच्या प्रस्तावास ...

भाईंदर : मीरा भाईंदर महापालिकेने महामार्गाजवळच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ ३० फूट उंचीचा पुतळा उभारण्याच्या निविदा मंजुरीच्या प्रस्तावास सत्ताधारी भाजपने सोमवारच्या स्थायी समिती सभेत विरोध केला आहे.

भाजपने बहुमताच्या बळावर हा प्रस्ताव फेटाळून लावल्याने शिवसेना, काँग्रेससह विविध स्तरांतून भाजपवर टीकेची झोड उठली आहे.

घोडबंदर किल्ल्याचे सुशोभीकरण एकीकडे सुरू असून, त्याठिकाणी जाणाऱ्या मुंबई, अहमदाबाद महामार्गाच्या जंक्शनवर सगणाई देवी मंदिराजवळ रस्त्यांच्यामध्ये मोठी जागा मोकळी आहे. त्यामुळे या जंक्शनवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३० फूट उंचीचा पुतळा उभारण्याचा ठराव २ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या महासभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३० फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पुतळा बसविण्याकामी शिल्पकार नेमण्यासाठी २ कोटी ९५ लाख रुपयांची निविदा काढली होती. या कामासाठी गारनेट इंटिरिअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने निविदा भरली होती. हे काम विशेष व वाकबगार शिल्पकारांचे असल्याने आलेली निविदा मंजुरीसाठी प्रशासनाने स्थायी समितीला सादर केली होती.

सत्ताधारी भाजपने प्रस्तावास विरोध करत निविदा पुन्हा सादर करण्याचा ठराव नगरसेवक दिनेश जैन यांनी मांडला. बहुमताने तो मंजूर करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कामाचा प्रस्ताव भाजपने फेटाळून लावला. विशेष म्हणजे भाजपने महाराजांच्या पुतळ्यास विरोध करण्याची भूमिका घेतल्याने भाजपचेच नगरसेवक सुरेश खंडेलवाल सभा सोडून निघून गेले.

याबाबत उपमहापौर हसमुख गेहलोत, ठराव मांडणारे जैन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी टीका केली आहे.

भाजपचे शिवछत्रपतींबद्दलचे प्रेम बेगडी असून, महाराजांपेक्षा यांना टेंडर टक्केवारीतील मलई खण्यात स्वारस्य असल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी केला आहे. भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामास केलेला विरोध संतापजनक असून, नागरिक व मनसे त्यांना त्यांची जागा दाखवेल, असे मनसेचे शहराध्यक्ष हेमंत सावंत यांनी म्हटले आहे.