शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-ओमी टीम @ ७०

By admin | Updated: February 9, 2017 04:03 IST

भाजपा व ओमी कलानी टीमचे ७० जण कमळाच्या चिन्हावर रिंगणात आहेत. ओमी टीमचे ४ जण भाजपा पुरस्कृत अपक्ष म्हणून, तर दोन ठिकाणी

उल्हासनगर : भाजपा व ओमी कलानी टीमचे ७० जण कमळाच्या चिन्हावर रिंगणात आहेत. ओमी टीमचे ४ जण भाजपा पुरस्कृत अपक्ष म्हणून, तर दोन ठिकाणी कवाडे गटाला पाठिंबा दिला आहे. एका ठिकाणी रिपाइंच्या बंडखोर लता निकम यांच्यासह एका अपक्षाला पुरस्कृत केले. भाजपा-ओमी टीमचा सिंधी परिसरात, तर शिवसेनेचा मराठी पट्ट्यात बोलबाला असून शहरात तिरंगी लढत होण्याचे संकेत आहेत. उल्हासनगरच्या इतिहासात प्रथम अनैसर्गिक राजकीय समीकरणे जुळली आहेत. ओमी कलानी टीमला प्रवेश देऊन भाजपाने शहरातील राजकारण बदलून टाकले. शहराने यापूर्वी कलानी विरुद्ध पूर्वीचा जनसंघ, भाजपा व शिवसेना अशी लढत बघितली आहे. कलानी कुटुंबाला राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी व भाजपाला महापालिकेवर महापौर आणायचा असल्याने दोघे एकत्र आले. या अभ्रद्र आघाडीमुळे भाजपाचा चेहरा काळवंडला आहे. सत्तेसाठी कोणतीही तडजोड करणारा पक्ष म्हणून भाजपाकडे पाहिले जात आहे. पक्ष प्रवेशापूर्वी ओमी कलानी यांच्यावरील गंभीर गुन्हे मागे घेण्याची खेळी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी खेळली आहे.भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ओमी टीमला प्रवेश दिल्याने पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांचे राजकीय भविष्य धोक्यात आले. तर, ओमी टीमचे सदस्य भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवत असून ओमी कलानींचे वर्चस्व वाढण्याचे संकेत राजकीय तज्ज्ञांनी दिले आहेत. ओमी हे नगरसेवक असताना आपली छाप महापालिका महासभेत पाडू शकले नाहीत. त्यांनी मौनी नगरसेवकांच्या यादीत स्थान मिळवले आहे. मात्र, त्यांचे पक्ष संघटन चांगले असून त्यांना तीन अपत्यांमुळे निवडणूक लढवता येणार नाही. शहरातील राजकारणात ते किंगमेकरची भूमिका वठवण्याची शक्यता आहे. त्यासाठीच त्यांनी पत्नी पंचम कलानी यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. (प्रतिनिधी)