शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कार्यक्रम महापालिकेचा निमंत्रणपत्रिका भाजपची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:13 IST

महापालिकेचे भार्इंदर पश्चिम येथील विनायकनगर सभागृहाचे उद््घाटन उद्या सायंकाळी होणार आहे

मीरा रोड : महापालिकेत सत्ताधारी आणि प्रमुखपदांवर असूनही भाजपने महापालिकेच्या मालमत्तांचे उद््घाटन, भूमिपूजन असताना त्याची निमंत्रण पत्रिका मात्र चक्क पक्षाची छापली आहे. भाजपची निमंत्रणपत्रिका स्वत: महापौरांपासून पक्षाच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी प्रसिध्द केली आहे.

महापालिकेचे भार्इंदर पश्चिम येथील विनायकनगर सभागृहाचे उद््घाटन उद्या सायंकाळी होणार आहे. तर पश्चिमेच्याच कमला पार्क येथील अग्निशमन केंद्राच्या मुख्यालयाच्या जागेत सांस्कृतिक भवन - सभागृह बांधण्याचे भूमिपूजन सकाळी होणार आहे. या मालमत्ता महापालिकेच्या असून त्याच्या कामासाठी निधीही महापालिकेचा वापरला आहे. हे दोन्ही कार्यक्रम महापौर डिंपल मेहतांच्या हस्ते केले जाणार आहेत.भाजपची पालिकेत एकहाती सत्ता आणि पदे असताना पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर भाजपच्या लोकप्रतिनिधींची नावे येणार हे स्पष्ट असतानाही भाजपने मात्र पक्षाची निमंत्रणपत्रिका छापून त्याचे सोशल मीडियापासून अन्यत्र वाटप केले आहे. भाजपच्या पत्रिकेवर प्रमुखांची तसेच पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे व नावे असून त्यात पंतप्रधान, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचीही छायाचित्रे आहेत.पालिकेकडून मात्र प्रशासनाने छापलेल्या पत्रिका देण्यात आल्या आहेत. पालिकेच्या पत्रिकेत भूमिपूजन, उद्घाटन महापौरांच्या हस्ते होणार तसेच आमदार, पालिका पदाधिकारी यांची नावे त्यात असूनही भाजपने पालिकेच्या पत्रिकेला केराची टोपली दाखवली आहे. पालिकेची मालमत्ता आणि पालिकेचा कार्यक्रम असताना त्याच्या निमंत्रण पत्रिकाही पक्षाच्या छापल्यावरून भाजपवर टीका होत आहे. तर पालिका या प्रकरणी काय कारवाई करणार ? असा सवाल उपस्थित होत आहे. 

टॅग्स :thaneठाणेmira roadमीरा रोड