शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

भाजप सदस्यनोंदणी अभियानात रंगले मानापमान नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 00:16 IST

ठाणे : जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी ठाण्यात भाजपानेआयोजित केलेल्या संघटना पर्व सदस्यता अभियान २०१९ कार्यक्रमात ...

ठाणे : जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी ठाण्यात भाजपानेआयोजित केलेल्या संघटना पर्व सदस्यता अभियान २०१९ कार्यक्रमात एकीकडे नवीन सदस्यनोंदणी सुरू असताना दुसरीकडे मानापमानाचे नाट्यदेखील रंगल्याचे दिसून आले. स्टेजवर बसण्यास व न बोलण्याच्या मुद्यावरून शहराध्यक्ष विरुद्ध भाजप युवाध्यक्ष यांच्यात काहीशी तू तू मैं मैं झाल्याचे दिसून आले. अखेर, या ठिकाणाहून भाजपा युवा अध्यक्षाने काढता पाय घेतला.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत मराठी कलावंत संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, अशोक समेळ, खगोलतज्ज्ञ दा.कृ. सोमण यांच्यासह रवींद्र प्रभुदेसाई, उद्योजक समीर नातू आदींनी यावेळी आपले सदस्यत्व नोंदवले. त्यामुळे हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर गेला होता. तावडे यांचे आगमन होताच, सर्वांना स्टेजवर पाचारण करण्यात आले. यावेळी आमदार निरंजन डावखरे, भाजपचे गटनेते नारायण पवार हे सुद्धा स्टेजवर गेले. परंतु, त्याचवेळेस भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष निलेश पाटील हे व्यासपीठाच्या समोरील बाजूस बसले होते. त्यांना व्यासपीठावर येण्यासाठी डावखरे आणि पवार यांनी हातवारे केले. परंतु, त्यांनी आमंत्रण नसल्याने जाण्यास टाळले. या मंडळींनी पुन्हा त्यांना बोलावल्यामुळे त्यांचा मान राखण्यासाठी त्यांनी व्यासपीठ गाठले खरे. पण तेथे त्यांना मान मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी व्यासपीठावरून खाली उतरून कार्यक्रमामधूनच काढता पाय घेतला. एकीकडे स्वत:ला शिस्तबद्ध पक्ष म्हणवणाऱ्या भाजपमधील हे मतभेद मंत्र्यांच्या उपस्थितीत चव्हाट्यावर आल्याची चर्चा कार्यक्रमात ऐकायला मिळाली.

मोर्चे, आंदोलने असली की, आमच्या शहराध्यक्षांना युवा मोर्चाची आठवण होते. मात्र, अशा कार्यक्रमाच्या वेळेस होत नाही. त्यामुळे आपण तेथून काढता पाय घेतला.- निलेश पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष, भाजपामुळात नेमका विषय काय झाला, याची मला कल्पना नाही. परंतु, पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्याने पक्षातील अंतर्गत विषयांची माहिती प्रसारमाध्यमांना देऊ नये.- संदीप लेले, शहराध्यक्ष, भाजप