शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भाजप गटनेत्याला शिवसैनिकांचा तासभर घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 23:34 IST

स्कायवॉकनिमित्त निवडणूक फंड गोळा केला जात असल्याचा केला होता आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : स्कायवॉकच्या उभारणीच्या निमित्ताने शिवसेना निवडणुकीसाठी फंड गोळा करीत असल्याच्या ठाणे महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांच्या विधानामुळे ते चांगलेच अडचणीत आले आहेत. डुंबरे यांच्या या विधानानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी व  महिला कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत गनिमी काव्याने डुंबरे यांच्या दालनात घुसून त्यांना घेराव घातला. त्यांनी केलेल्या विधानाचा थेट जाब विचारत डुंबरे यांनी शिवसेनेची आणि महापौरांची माफी मागावी, अशी मागणी केली. अखेर सात दिवसांत खुलासा करतो, असे डुंबरे यांनी सांगिल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी त्यांचे दालन सोडले.  

यापूर्वी कोट्यवधींचा खर्च करून बांधलेले स्कायवॉक काढण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली असताना आणखी तीन स्कायवॉकवर कोट्यवधींचा खर्च करण्याचा घाट मनपा प्रशासनाने घातला आहे. घोडबंदर येथे दोन, तर कॅडबरी येथे तीन स्कायवॉक बांधण्याचा प्रस्ताव मनपाने तयार केला असून यासाठी १३ कोटींचा खर्च केला जाणार आहे. या स्कायवॉकच्या उभारणीला भाजपचे डुंबरे तसेच मनसेने आक्षेप घेतला होता. डुंबरे यांनी थेट शिवसेनेवर हल्लाबोल करताना स्कायवॉक उभारणीतून शिवसेना निवडणुकीचा फंड गोळा करत असल्याचा आरोप केला. यामुळे शिवसेनेचे नगरसेवक कमालीचे आक्रमक झाले. दुपारी ४ वाजता नगरसेविका राधिका फाटक, मीनल संख्ये, विमल भोईर, सिद्धार्थ ओलवळेकर, विकास रेपाळे, दिलीप बारटक्के, सुधीर कोकाटे आदी डुंबरे यांच्या दालनात घसले. शिवसेनेची आणि महापौरांची जाहीर माफी मागा, अशी मागणी करीत त्यांनी घोषणाबाजी केली. स्कायवॉकची महिलांची तसेच नागरिकांची मागणी असताना तुम्ही असे विधान कसे करू शकता, असा प्रश्न नगरसेवकांनी केला. सुमारे तासभर हे आंदोलन सुरू होते. अखेर यावर योग्य तो खुलासा आठवड्याभरात देण्याचे आश्वासन डुंबरे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

दबाव खपवून घेणार नाहीमी माझ्या पक्षाची भूमिका मांडली असून शिवसेनेने कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला तरी मी दबाव खपवून घेणार नाही. कोरोनाचा कहर सुरू असताना स्कायवॉकच्या कामांची घाई नको. ती नंतरदेखील होऊ शकतात. यासाठी कोट्यवधींचा खर्च कशाला करायला हवा. ठाण्यात सत्ता शिवसेनेची असल्यामुळे तेच या सर्व गोष्टींना जबाबदार आहेत. पक्ष माझ्या बाजूने उभा आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले असून सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. कोरोनाच्या कारणास्तव प्रशासन महासभा घेत नाही. मात्र, एकट्या भाजप पदाधिकाऱ्याला घेरण्यासाठी १५० सत्ताधारी शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र येतात, तर त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन होत नाही का? त्यामुळे आंदोलक शिवसैनिकांवर कारवाई करावी.              - मनोहर डुंबरे, गटनेते, भाजप

भाजपच्या प्रभाग सुधारणा निधीवर येणार गंडांतर भाजप गटनेत्याने केलेल्या आरोपाविरुद्ध केवळ आंदोलन करून शिवसेना गप्प बसणार नाही, तर भाजप नगरसेवकांच्या प्रभाग सुधारणा निधीवर गंडांतर येण्याची चिन्हे आहेत, असे संकेत शिवसेनेच्या गोटातून देण्यात आले.

शिवसेनेकडूनच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघनआंदोलनाच्या वेळी शंभरहून अधिक महिला कार्यकर्त्यांनी भाजपच्या गटनेत्यांच्या कार्यालयात मोठी गर्दी केली होती. गर्दीत अनेकांना गुदमरायला झाले. ठाण्यात कोरोना वाढला असताना सत्ताधारी शिवसेनेकडूनच या आंदोलनाच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

डुंबरे पडले एकटे : शिवसेनेच्या या आंदोलनादरम्यान डुंबरे यांचा बाजूने भाजपचा एकही नगरसेवक धावून आला नाही. शिवसेनेने आंदोलन अचानक केले असले तरी एक तासभर सुरू होते. मात्र, भाजपचा एकही नगरसेवक डुंबरे यांच्या बचावाकरिता फिरकला नाही.

टॅग्स :thaneठाणे