शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

भाजपात असंतोष

By admin | Updated: June 28, 2017 03:24 IST

स्वपक्षाच्या काहींचा काटा काढण्यासाठी, पक्षात स्वत:ची ताकद आणि वर्चस्व वाढवण्यासाठी, अन्य पक्षाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्याचा सपाटा लावणाऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : स्वपक्षाच्या काहींचा काटा काढण्यासाठी, पक्षात स्वत:ची ताकद आणि वर्चस्व वाढवण्यासाठी, अन्य पक्षाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्याचा सपाटा लावणाऱ्या भाजपा आमदार नरेंद्र मेहतांपुढे आता उमेदवारी कोणाला द्यायची? याचे धमर्संकट उभे ठाकले आहे. पक्षातील जुने कार्यकर्ते, अनेक विद्यमान नगरसेवक तसेच गरजेपोटी आश्वासने देऊन पक्षात घेतलेल्या अनेकांचे पत्ते कापले जाणार असल्याच्या चर्चेने भाजपात असंतोष खदखदत आहे. त्यामुळे मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीत सर्वात जास्त बंडाळी भाजपात होण्याची चिन्हे आहेत. बंड मोडून काढणे, निवडणुकीचे वारे समजून घेणे, त्यात ठराविक मुद्दे योग्य वेळी आणणे, वेगवेगळे समाजगट सांभाळणे आणि आर्थिक आघाडी भक्कम असणे ही मेहता यांची वैशिष््टये मानली जातात. त्यातच मुंबई-ठाणे, भिवंडीप्रमाणेच पक्षाकडूनही उमेदवारांना घसघशीत निधी मिळणार असल्याने भाजपात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे.विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मेहता यांनी जी गणिते जुळवली त्यावेळेपासूनच अनकांना पालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यातील अनेकांची गरज आता संपली आहे. त्यातही पालिकेत भाजपाची सत्ता आणायची असेल तर बदलेलेल्या प्रभाग रचनेचा, सामाजिक गणितांचा विचार महत्त्वाचा असल्याने पक्षातील विद्यमान नगरसेवकांचाही पत्ता कापला जाण्याची चिन्हे आहेत. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादीलाही भगदाड पडल्याने, मनसे, बविआही निष्प्रभ ठरल्याने शिवसेना वगळता एकही प्रभावी विरोधक उरलेला नाही. त्यामुळे आर्थिक व राजकीयदृष्ट्या सक्षम झालेल्या मेहता यांचाच एकछत्री अंमल आणि प्रभाव या निवडणुकांवर आहे. भाजपाच्या प्रदेश नेतृत्वानेही त्यांच्याच हाती निवडणुकीची सूत्रे सोपवल्याने पक्षांतर्गत नाराजांनाचाही आवाज दाबला गेला आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी बाहेरून पक्षात आलेल्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. निवडणुकीला जेमतेम महिना-सव्वा महिना उरला आहे. त्यातच प्रभागाचा आकारही दुप्पट झाला आहे आणि स्वबाविकपणे खर्चही. त्यामुळे इच्छुकांत धाकधूक आहे. मेहतांनी मात्र काही ठराविक जणांनाच प्रचारासाठी हिरवा कंदिल दाखवला आहे आणि उरलेल्यांना सबुरीचा उपदेश केला आहे. त्यातही सध्याच्या पद्धतीनुसार अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत बहुतांश इच्छुकांना झुलवत ठेवले जाऊ शकते. त्यामुळे अनेक उमेदवारांत असंतोष खदखदत आहे. माजी आयुक्त शिवमूर्ती नाईक, ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक ओमप्रकाश अग्रवाल, ज्येष्ठ कार्यकर्ते अ‍ॅड. दिलीप पंडित, भगवान कौशिक आदींनी आधीच मेहतांविरुध्द बंडाचा झेंडा फडकावत नव्या भाजपाची स्थापना केली आहे.