शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेवकांकडूनच २७ गावांशी गद्दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 02:49 IST

केडीएमसी हद्दीतील २७ गावांची स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबत कोकण आयुक्तांकडे हरकती, सूचना यावर कार्यवाही सुरू आहे

डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील २७ गावांची स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबत कोकण आयुक्तांकडे हरकती, सूचना यावर कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती. पण, तरीही २७ गावांतील युवकांना मात्र भाजपाच्या दुटप्पी भूमिकेबद्दल शंका आहे. भाजपाचे नगरसेवकच २७ गावांशी गद्दारी करत आहेत, असा थेट आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांनी केला. स्वतंत्र नगरपालिकेबाबत सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाच्या वार्तालापामध्ये पाटील यांनी ही भूमिका मांडली. केडीएमसीच्या निवडणुकीच्या वेळी भाजपाने खेळी करत संघर्ष समितीला अंधारात ठेवले. अचानक उमेदवार उभे केले. निवडून आलेले नगरसेवक आधी २७ गावांच्या नगरपालिकेबाबत अत्यंत आक्रमक होते. मात्र, निवडून आल्यानंतर काही नगरसेवकांनी मूळ भूमिकेपासून ‘यू-टर्न’ घेत ती गावे महापालिकेतच राहावी, अशी भूमिका घेतली. मुळात महापालिका आधीच शहरी भागांत सोयीसुविधा देत नाही, ती या गावांमध्ये नव्याने काय सोयीसुविधा देणार, असा प्रश्न पाटील यांनी केला.सध्या गावांची स्थिती वाळीत टाकल्यासारखी झाली आहे. सुविधांअभावी पार बोजवारा उडाला आहे. ग्रामपंचायत असताना गावांची स्थिती उत्तम होती. मात्र, तीन वर्षे पालिकेत येऊन अक्षरश: आमची वाट लागल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.>‘तो’ मॉल बंद कराकल्याण-शीळ मार्गावर मोठ्या प्रमाणावर कोंडी होत आहे. त्याला निळजे येथील मॉल जबाबदार आहे. शिवाय तेथील गृहसंकुलातील लोकसंख्या वाढली आहे. मात्र, वाहतुकीचे नियोजन केलेले नाही. हा प्रश्न निकाली निघत नाही, तोपर्यंत तो मॉल बंद ठेवावा, अशी मागणीही पाटील यांनी केली. याबाबतही लवकरच राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका