शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा भरावामागे भाजपाचे नगरसेवक, शेतकऱ्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:58 IST

मुर्धा गावातील बेकायदा माती भराव प्रकरणी १७३ शेतक-यांना दंडात्मक कारवाईसाठी तहसीलदारांचे पत्र आल्याने खासदार राजन विचारे, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी कारवाईला विरोध केला आहे.

मीरा रोड : मुर्धा गावातील बेकायदा माती भराव प्रकरणी १७३ शेतक-यांना दंडात्मक कारवाईसाठी तहसीलदारांचे पत्र आल्याने खासदार राजन विचारे, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी कारवाईला विरोध केला आहे. शेतक-यांची फसवणूक करून काही नगरसेवकांनी स्वत:च्या फायद्यासाठी भराव करुन घेत शेतकºयांना वेठीस धरल्याचा आरोप केला आहे. तर मंडळ अधिकारी यांनी गुरूवारी पुन्हा घटनास्थळाचा पंचनामा करत शेतकºयांचे जबाब घेतले असता त्यांनी नगरसेवकांची नावे घेतल्याने खळबळ उडाली आहे.मुर्धा गावामागील बांधावरुन मोठ्या प्रमाणात शेतकºयांच्या शेतजमिनीत भराव करण्यात आला आहे. भराव केल्या प्रकरणी तहसीलदारांनी तब्बल १७३ शेतकºयांना सुनावणीसाठी पत्र धाडल्याने गावात खळबळ उडाली. हा भराव सुरू असताना काही शेतकºयांनी सुरूवातीला त्यास विरोध केला होता. पालिका व तलाठी कार्यालयात तक्रारीही केल्या होत्या. पण त्यावेळी मात्र या यंत्रणांनी डोळेझाक केली.शेतकºयांनी खासदार राजन विचारे, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्याकडे व्यथा मांडली असता त्यांनीही तहसीलदारांना भराव प्रकरणी शेतकºयांवर अन्याय झाला असून फसवून भराव करणाºया नगरसेवकांवर कारवाई करा असे म्हटले आहे. दरम्यान, विचारे व मेंडोन्सा यांनी शेतकºयांची बाजू मांडल्यानंतर गुरूवारी मंडळ अधिकारी अनारे यांनी शेतकºयांसोबत मातीच्या भरावाची पुन्हा पाहणी केली. या वेळी संतप्त शेतकºयांनी जबाबामध्ये थेट भाजपाचे नगरसेवक जयेश भोईर, नयना म्हात्रे, सुरेश खंडेलवाल व गजानन म्हात्रे यांची नावे दिली आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पालिकेच्या विकास आराखड्यातील रस्ता असल्याचे सांगून हा भराव केला. ७०० फूट लांब भराव केला असून हा भराव काढावा असे शेतकºयांनीम्हटले आहे.>केवळ राजकीय हेतूने आम्हा भाजपा नगरसेवकांची खोटी नावे दिली आहेत. हा आरोप करणाºयांची येथे जमीनच नाही. आम्ही ग्रामस्थांशी चर्चा करूनच पालिका विकास आराखड्यातील रस्त्यासाठी म्हणून भरावाची मान्यता घेतली होती. पालिकेने सर्व्हे करून रस्ता हद्दीचे खांब घातले आहेत. पण भराव आम्ही केलेला नाही. - जयेश भोईर, नगरसेवक, भाजपा