शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बिऱ्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर; मोर्चेकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन, २ तासापासून रस्ता जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2023 13:26 IST

बिऱ्हाड मोर्चाला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली होती.  

कसारा,  शाम धुमाळ: राज्यभरातील आदिवासी विकास विभागातील रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांचा मुंबई येथील मंत्रालयाकडे निघालेला बिऱ्हाड मोर्चा इगतपुरीत मुक्कामी स्थिरावला आहे. नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथून विविध मागण्यासाठी या बिऱ्हाड मोर्चाला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली होती.  

शाळेतील आणि वसतिगृहातील रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचारी यांचा हा बिऱ्हाड मोर्चा असुन दिनांक २५ मे २०१३ रोजीचे आदिवासी विकास विभागाचे शासन पत्र रद्द करावे, दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर बाहेरील कर्मचाऱ्यांना घेऊ नये, दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांना दहा वर्षे पूर्ण होईपर्यंत शासन सेवेत संरक्षण देण्यात यावे तसेच त्यांना सेवेतून कमी करू नये अशा प्रमुख मागण्या या मोर्च्याकरांच्या आहेत. विशेष म्हणजे दुपारच्या सुमारास काही वेळा जोरदार पावसाच्या सरी कोसळल्यामुळे मोर्चेकरी चिंब भिजले होते.

आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला  सिटु संघटनेने पाठींबा दिला असुन मुंबईच्या दिशेने रावांना होण्यासाठी मुबईच्या वेशीवर दाखल झाला आहे.मुंबई ची वेस असलेल्या कसारा घाटात हा मोर्चा आला असून. सरकारने त्यांच्या मागण्यांचा विचार करून ताबडतोब निर्णय घ्यावा ही मागणी करून या मोर्चाला विविध संघटनानी पाठिंबा दिला आहे. . या मोच्यात मोठ्या प्रमाणावर महिला लहान मुले व अपंग युवक आहेत. गुरुवाई सकाळी हा बिऱ्हाड मोर्चा महामार्गावरील कसारा घाटात दाखल झाला असून पुढे निघाला आहे.अरे या सरकारचे करायचं काय खाली डोक वर पाय अशा अनेक घोषणा देऊन सरकारचा धिक्कार केला. हजारो मोर्चे करांनी अचानक मुबई नाशिक व नाशिक मुबई महामार्गांवरील दोन्ही कसारा घाटात रस्ता रोको केला असून वाहणांच्या लाबाचं लांब रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :thaneठाणे