शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

पक्षिमित्रांना ठाण्यातही हवी आहे बर्ड रेस, ठाणेनगरी गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 2:59 AM

ठाणे : ३१ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन उंबरठ्यावर येऊन ठेपले असताना ठाण्यात बर्ड रेस सुरू करण्याची आग्रही मागणी पक्षीमित्रांकडून या संमेलनाच्या निमित्ताने केली जात आहे.

प्रज्ञा म्हात्रे ठाणे : ३१ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन उंबरठ्यावर येऊन ठेपले असताना ठाण्यात बर्ड रेस सुरू करण्याची आग्रही मागणी पक्षीमित्रांकडून या संमेलनाच्या निमित्ताने केली जात आहे. या संमेलनानिमित्ताने कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, रत्नागिरी, सोलापूर, चिपळूण, जळगाव, औरंगाबाद येथून पक्षीमित्र दाखल होत असल्याने संमेलनस्थळ गजबजू लागले आहे.मूळात १९८४ साली हाँगकाँगमध्ये ‘बर्ड रेस’ हा अनोखा उपक्र म सुरू झाला. पक्षिनिरीक्षणाच्या छंदातून निसर्ग संवर्धनासाठी प्रवृत्त करणाºया या उपक्रमाच्या बघताबघता जगभरात आवृत्त्या निघाल्या. ठाणे शहराच्या जवळ मुंबईत २००५ पासून बर्ड रेस मोठ्या उत्साहाने घेतली जाते आणि ठाण्यातील पक्षीनिरीक्षक त्यात भाग घेऊन पारितोषिकेही पटकावतात. तसे पाहता ठाण्यातील पक्ष्यांचे सर्वेक्षण होप आणि पर्यावरण दक्षता मंचतर्फे गेली तीन वर्षे केले जात आहे. या सर्व्हेनुसार ठाण्यात २५० हून अधिक वेगवेगळ््या प्रकारांचे पक्षी आढळत असल्याची नोंद झाली आहे.सोनेरी पाठीच्या सुतारापासून ते शुभशकुनी भारद्वाजापर्यंत आणि कच्छच्या रणातून येणाºया फ्लेमिंगोंपासून ते चिमुकल्या सनबर्डपर्यंत... असे ठाण्याचे पक्षिवैभव थक्क करणारे आहे. हे पक्षिवैभव अधिकाधिक लोकांना कळावे, दिसावे आणि त्याचे जतन व्हावे यासाठी आता पक्षिमित्र संमेलनाच्या निमित्त्ताने ठाण्यात बर्ड रेस सुरू व्हावी, ज्यात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. तसेच, सर्वसामान्यांना पक्ष्यांची दुनिया कळेल आणि आपोआप निसर्ग संवर्धनात त्यांचा सहभागही वाढेल. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या पाठिंब्याने होप नेचर ट्रस्टकडून असा उपक्र म जानेवारी २०१८ मध्ये सुरू व्हावा, अशी अपेक्षा ठाण्यातील पक्षिमित्र करत आहेत.बर्ड रेस म्हणजे काय?वेगवेगळ््या गटांना पक्षिनिरीक्षणासाठी परिसर वाटून दिले जातात. सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत त्यांनी तेथे पक्षी पाहून नोंद करायची. ज्यांना अधिक पक्षी दिसतील, दुर्मीळ पक्षी दिसतील, ते ओळखून नोंद करता येईल, त्या गटाला बक्षिस दिले जाते.>स्थानिकांचाही सहभाग३१ व्या पक्षिमित्र संमेलनामध्ये जी सादरीकरणे सादर होणार आहेत त्यात स्थानिकांच्या सहभागातून पक्षी संवर्धन या विषयावरील दोन प्रेझेंटेशन पाहायला मिळणार आहेत.नागालँडमध्ये ‘आमूर फाल्कन’ या शिकारी पक्ष्याचे रक्षण करण्यासाठी तेथील स्थानिकांचा जो सहभाग मिळाला आहे, त्यामुळे गेल्या दोन, तीन वर्षांमध्ये या पक्ष्यांची शिकार कमी झाली आहे. पक्ष्यांच्या संरक्षणामध्ये त्या त्या प्रदेशातील स्थानिक किती महत्वाची भूमिका बजावू शकतात हे सांगणारे आणखी एक सादरीकरण डॉ. गोल्डिन क्वाड्रिस सादर करणार आहेत.ठाण्याला लाभलेली किनारपट्टी आणि त्यावरील जैवविविधता जपण्यासाठी हे सादरीकरण महत्वाचे ठरेल. फ्लेमिंगो अभयारण्यामुळे ठाण्याच्या खाडीला जे संरक्षण मिळाले आहे, त्याला स्थानिकांच्या सहभागाची जोड मिळाली तर हे अभयारण्य एक आदर्श पक्षितीर्थ ठरेल यात शंका नाही.>छायाचित्र प्रदर्शनमहाराष्ट्रातील ८०हून अधिक छायाचित्रकारांनी टिपलेल्या पक्ष्यांचे अनोखे छायाचित्र प्रदर्शन हे या संमेलनाचे आणखी एक आकर्षण असणार आहे. त्यात पक्ष्यांची विविध रूपे पाहायला मिळतील. गडकरी रंगायतनच्या तालीम हॉलमध्ये २५ आणि २६ नोव्हेंबरला भरणारे हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.>पक्ष्यांना द्या घरटीठाण्याने जपलेल्या हिरवाईतील पक्षी वैभव जपण्यासाठी उंच उंच इमारतींमध्ये राहणारे लोक काय करू शकतात? तर आपल्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेसमध्ये बर्ड फिडर्स लावून पक्ष्यांच्या चिमणचाºयाची सोय करू शकतात.पक्ष्यांना निवारा करता यावा, अशी घरटी लटकावून मदत करू शकतात. या संमेलनाच्या निमित्ताने पर्यावरण जागृती प्रदर्शनात ‘अरण्या’ ही संस्था असे बर्ड फिडर्स आणि नैसर्गिक वस्तूंपासून बनवलेली कृत्रिम घरटी घेऊन येणार आहे.आपल्या अंगणातून दूर गेलेल्या चिऊतार्इंना परत आणण्याची ही संधी ठाणेकरांनी अवश्य घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यthaneठाणे