शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बिल थकवल्याने टाउन हॉल अंधारात, वर्षभराचे १३ हजार भरणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 02:40 IST

ठाण्याच्या सांस्कृतिक नगरीत मुख्य स्थान असलेल्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित येणा-या ऐतिहासिक टाउन हॉलचे ११ महिन्यांचे विजेचे १३ हजार ३० रुपयांचे बिल गेले वर्षभर न भरल्याने सात दिवसांपासून या हॉलची वीज महावितरणने कापली आहे.

ठाणे : ठाण्याच्या सांस्कृतिक नगरीत मुख्य स्थान असलेल्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित येणा-या ऐतिहासिक टाउन हॉलचे ११ महिन्यांचे विजेचे १३ हजार ३० रुपयांचे बिल गेले वर्षभर न भरल्याने सात दिवसांपासून या हॉलची वीज महावितरणने कापली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठका व कार्यक्रम आठवडाभर अंधारातच उरकण्यात आले. रविवारपासून एका प्रदर्शनाला हा हॉल दिल्यामुळे बिल देण्याच्या हालचाली सुरू झाल्या.सांस्कृतिक नगरी असलेल्या ठाण्यात टाउन हॉलला खास महत्त्व आहे. १९२७ साली बांधलेली ही ऐतिहासिक वास्तू जिल्हाधिकाºयांकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या वास्तूचे २०१५ मध्ये नूतनीकरण करून सांस्कृतिक केंद्रात रूपांतर करण्यात आले. नूतनीकरणानंतर हॉलला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु, गेल्या वर्षभरापासून विजेचे बिल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्यात न आल्याने ‘महावितरण’ने शुक्रवार, २ फेब्रुवारीला टाउन हॉलची वीजजोडणी कापली. १५ मार्च २०१७ ला टाउन हॉलचे शेवटचे बिल भरण्यात आले. त्यानंतर, आजतागायत एकही बिल भरण्यात आले नसून आतापर्यंतची थकीत रक्कम १३ हजार ३० रुपये असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. शुक्रवारी बिग आर्ट इन्स्टिट्यूटनेचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन रविवार, ११ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने महावितरणला मेल करून बिल भरण्याची कार्यवाही सुरू असल्याने टाउन हॉलची वीज जोडण्याची मागणी केली.निवासी जिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, असे व्हायला नको. मात्र, मी वस्तुस्थिती विचारून सांगते.>सार्वजनिक बांधकामच्या निष्काळजीपणाचा फटकासार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) च्या निष्काळजीपणामुळे टाउन हॉलचा विद्युतपुरवठा काही दिवसांपासून खंडित झाला आहे. १३ हजार रुपयांचे थकीत वीजबिल वेळेत न भरल्यामुळे वीज कापली आहे. यामुळे सभा, बैठकांसह विविध संमेलनांसाठी विजेशिवाय हॉल वापरण्यात येत होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागावर जबाबदारी ढकलत आहेत. या हॉलच्या वापरासाठीचे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातून होते. अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या हॉलचा वीजपुरवठा खंडित होईपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करणे, यात जिल्हाधिकारी कार्यालयाची काहीच चूक नाही, हे म्हणणे योग्य नसल्याची चर्चा बांधकाम विभागातील कर्मचाºयांमध्ये ऐकायला मिळत आहे.