शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीची फसवणूक; १८०५ पानी दोषारोपपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:38 IST

गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या सागर इनव्हेस्टमेण्ट कंपनीच्या मुख्यसूत्रधारासह चौघांविरोधात ठाणे

ठाणे : गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या सागर इनव्हेस्टमेण्ट कंपनीच्या मुख्यसूत्रधारासह चौघांविरोधात ठाणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने १,८०५ पानी पुरवणी दोषारोपपत्र बुधवारी कल्याण विशेष न्यायालयात दाखल केले आहे. यामध्ये ३ हजार १०० गुंतवणूकदारांची एकूण १५९ कोटी ७८ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून त्या संबंधित पुरावे जोडले आहेत.फसवणुकीप्रकरणी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा वर्ग झाल्यानंतर मागील वर्षी जून महिन्यात सुहास समुद्र आणि सुनिता या दोघांना अटक केली होती. तर, सध्या ते दोघे जामिनावर असून त्यांच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल केले आहे. तसेच सागर इनव्हेस्टमेण्ट कंपनीचे व्यवस्थापनाचे काम सुहास समुद्र यांचा मुलगा श्रीराम आणि त्याची सून अनघा पाहत होती. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीराम यांच्यासह काही जण फरार झाले होते. दरम्यान, त्यांनी जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांचे अर्ज फेटाळून लावले होते. त्यानंतर श्रीराम याच्यासह त्यांची पत्नी अनघा आणि काकू सुप्रिती तसेच चुलत भाऊ कैव्यल्य या चौघांना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. चौकशीत कल्याण येथील एका बँकेत श्रीराम याच्या खात्यात ५ लाख असल्याचे समोर आल्यावर ते पैसे गोठवले. चौकशीत त्या चौघांनी ३ हजार १०० गुंतवणूक दारांना १५९ कोटी ७८ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय धुरी यांनी दिली. तर, त्यांच्या तपासात ज्या बाबी समोर आल्या आहेत. त्या सर्व पुरावे म्हणून पुरवणी दोषारोपपत्रात जोडल्याचे पोलिसांनी सांगितले.अटकेनंतर बदलापूरमधील सागर हाउसमध्ये छापा मारून घरातील दोन संगणकामधील हार्डडिस्क पोलिसानी जप्त केल्या होत्या.कल्याण येथील एका बँकेत श्रीराम याच्या खात्यात ५ लाख रुपये असल्याचे समोर आल्यावर ते पैसे गोठवले.