शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
3
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
4
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
5
'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज
6
मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत
7
फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात
8
कमाल! नोकरीसोबतच घरची जबाबदारी, ६ वेळा नापास; २ मुलींची आई ४० व्या वर्षी झाली IAS
9
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
10
Delhi Blast: दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी किती पैसे दिले गेले होते, डॉ. शाहीनची काय होती भूमिका?
11
बँकिंग शेअर्समध्ये ऐतिहासिक तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार वाढ; 'ही' आहेत प्रमुख ४ कारणं
12
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
13
DIY Tips: ड्राय क्लीनिंगचा खर्च वाचवा! कपड्यांवरील चिवट डाग काढण्यासाठी 'हा' घरगुती फॉर्म्युला वापरा 
14
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
15
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
16
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
17
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
18
Gold & Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
19
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
Daily Top 2Weekly Top 5

नशेसाठी दुचाकी चोरणाऱ्यास अटक ; ९ गुन्हे उघडकीस तर १० दुचाकी जप्त

By धीरज परब | Updated: February 6, 2023 19:52 IST

पोलिसांनी चोरीच्या १० दुचाकी हस्तगत केल्या असून त्याची किंमत ४ लाख २० हजार इतकी असल्याचे सांगण्यात आले. 

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा १ ने सराईत दुचाकी चोरट्यास अटक केली आहे. नशेसाठी तो दुचाकी चोरत होता व त्याने केलेले ९ गुन्हे उघडकीस आणून १० दुचाकी जप्त केल्या आहेत.  

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकी चोरीचे गुन्हे वाढत असल्याने सदर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व घडलेल्या गुन्ह्यांची उकल होण्यासाठी गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे व सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविराज कुराडे , सहायक निरीक्षक पुष्पराज सुर्वे सह संतोष चव्हाण, राजु तांबे, संदीप शिंदे, किशोर वाडीले, संजय पाटील, अविनाश गर्जे, प्रफुल्ल पाटील, विकास यादव आदींच्या पथकाने दुचाकी चोरांचा शोध सुरु केला . 

तपास करीत असताना मिळालेल्या तांत्रीक माहितीचे विश्वलेषण करुन तसेच पो. हवा. समिर यादव यांना गुप्त बातमीदार कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विघ्नेश उदय मिश्रा (२३) रा . जुपीटर बिल्डींग, दिपक हॉस्पीटल जवळ, मीरारोड ह्याला ताब्यात घेतले . त्याच्या कडे चौकशी केली असता काशीमीरा पोलीस ठाण्यात दाखल राजेश जैन यांची दुचाकी चोरी त्याने केल्याचे निष्पन्न झाले . 

त्याला अटक करून पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत ४ , मीरारोड पोलीस ठाणे हद्दीत २ तर नवघर व तुळींज आणि मुंबईच्या डी एन नगर पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी १ या प्रमाणे एकूण ९ दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले . पोलिसांनी त्याच्या कडून चोरीच्या १० दुचाकी हस्तगत केल्या असून त्याची किंमत ४ लाख २० हजार इतकी असल्याचे सांगण्यात आले . 

 

टॅग्स :thaneठाणे