शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला मोठा धक्का

By admin | Updated: February 24, 2017 07:43 IST

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मागील वेळेपेक्षा यंदा काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

पंकज रोडेकर / ठाणे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मागील वेळेपेक्षा यंदा काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ५२ जागांवर उमेदवार देऊनही काँग्रेसच्या चिन्हावर तिघे आणि एक पुरस्कृत असे चारच जण विजयी झाल्याने पक्ष एका हाताच्या बोटांवर मोजता येण्याएवढाच उरला आहे. निर्णायकी अवस्थेत असलेल्या पक्षाला निवडणुकीपूर्वी गळती लागली होती. आघाडीला विरोध करून स्वत:चे अस्तित्व टिकवण्याची खुमखुमी काही नेत्यांत होती, पण पक्षाचे निवडणूक प्रभारी-माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी वस्तुस्थितीची जाणीव करून देत आघाडीचा निर्णय घ्यायला लावला आणि त्यामुळे पक्षाची उरलीसुरली अब्रू वाचली. काँग्रेसमधून सर्वाधिक वेळा निवडणूक लढणारे ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे हे स्वत:च्या प्रभागापुरते उरले. ते असोत किंवा महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा शिल्पा सोनोने या दोघांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून शिंदे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अर्थात, त्यांच्याकडे गमावण्याजोगे काही नव्हते. पण, एकेकाळी सत्तेच्या परिघात असलेल्या पक्षाने मात्र यानिमित्ताने बरेच काही गमावले. ठामपाच्या २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेसने ६२ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यातील १८ उमेदवार निवडून आल्याने काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. दरम्यानच्या काळात पक्ष निर्णायकी होत गेल्याने काही उमेदवारांनी पक्षाला रामराम ठोकत इतर पक्षांचा आसरा घेतला. ही गळती निवडणुकीच्या तोंडावरही कायम राहिली. त्यांना थांबवण्यात किंवा समर्थ पर्याय म्हणून उभे करण्यात पक्षाची नेतेमंडळी अपयशी ठरली. त्यानंतरही पक्षाने ५२ उमेदवार उभे केले. शहराध्यक्ष मनोज शिंदे आणि त्यांचे बंधू, प्रदेश सचिव पूर्णेकर यांचे बंधू छत्रपती यांना त्यात संधी मिळाली. त्या सर्वांचा पराभव झाला.