शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
2
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
3
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
4
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
5
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
6
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
7
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
8
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
9
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय
10
राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
11
'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्
12
प्रज्वल रेवन्ना भारतात येणार, बंगळुरूसाठी फ्लाइट तिकीट बुक!
13
"हात खुर्चीला बांधले होते, आम्ही रडत होतो"; स्टार किड्सनी सांगितला 'तो' भयंकर प्रसंग
14
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
15
थरार: गाढ झोपलेल्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
16
बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल
17
महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
18
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
19
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली; PCB च्या मागणीनंतर निर्णय, जाणून घ्या कारण
20
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या

ठाण्यातील येऊर जंगलात मोठी आग, पाच तासानंतर आग आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 10:58 PM

ठाण्यातील येऊर येथील जंगलास मंगळवारी सायंकाळी आग लागली. वन विभागाच्या जवळपास पाच तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. आगीमुळे जवळपास दीड ते दोन एकर परिसरातील वनसंपदेची हानी झाली.

ठाणे - ठाण्यातील येऊर येथील जंगलास मंगळवारी सायंकाळी आग लागली. वन विभागाच्या जवळपास पाच तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. आगीमुळे जवळपास दीड ते दोन एकर परिसरातील वनसंपदेची हानी झाली.येऊर येथील जंगलामध्ये मामा भाच्याचा डोंगर आहे. या डोंगरावरील झाडांनी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. वनपाल सुजय कोळी आणि त्यांच्या पाच ते सहा सहकार्यांनी आग मिटविण्यासाठी परिश्रम घेतले. रात्री 10 वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती ठाण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी अर्जुन निचिते यांनी दिली. रविवारी याच जंगलात मानपाडा येथील भागामध्ये आग लागली होती. दरम्यान, भाईंदर पाड्यातील नागला बंदर जवळ असलेल्या आणखी एका जंगलास मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अद्याप सुरू असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

टॅग्स :thaneठाणे