शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याला परतीच्या पावसाचा मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 01:11 IST

दोन-तीन दिवसांपासून रिपरिप; हाती आलेले पीक वाया जाण्याची भीती

जव्हार : जव्हार-मोखाडा तालुक्यांना काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले होते, तर मागील दोन ते तीन दिवसांपासून खेडोपाड्यात काही ठिकाणी पावसाच्या धारा पडत आहेत. यामुळे हळव्या वाणातील कापणी केलेल्या भातपिकाचे प्रचंड नुकसान होत आहे. हातात आलेले पीक वाया जात असल्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे.हळव्या वाणातील भातपिके कापणीस तयार झाली आहेत. ठिकठिकाणी पिवळ्या सोन्यावाणी शेती बहरली आहे. काही शेतकऱ्यांनी कापणीस सुरुवातही केली आहे. मात्र, कापणी केलेल्या या पिवळ्या सोन्याला घरी आणण्यापूर्वीच परतीच्या पावसाने दरोडा टाकण्यास सुरुवात केल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांसमोर कुजून जाताना पाहून बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे.कोरोनाचा धोका पत्करून व टाळेबंदीचा सामना करून येथील शेतकºयांनी मोठ्या मेहनतीने या वर्षी भाताची लागवड केली आहे. अगदी सोन्यावाणी भात पिकून आले आहे. वेळीच या भाताची कापणी केली तर या भाताचा चांगला तांदूळ तयार करता येईल. अन्यथा जास्त दिवस शेतातच राहिले तर ते शेतात गळून जाईल, अशी भीती शेतकºयांना असल्याने शेतकºयांनी कापणी सुरू केली आहे.मात्र कापणी केलेल्या भाताचे कडपे रोजच संध्याकाळी कोसळत असलेल्या पावसाने भिजत आहेत. काही ठिकाणी कडपे शेतात साचलेल्या पावसाच्या पाण्याने कुजून जावून भाताच्या कणसांना मोड येऊ लागले आहेत.दरम्यान, आॅगस्ट महिन्यातही अतिवृष्टीमुळे जवळपास ३९७.३५ हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे पंचनामे महसूल विभागाकडून करण्यात आले आहेत. या नुकसानीत भात १५७.६४ तर नागली २३९.७१ हेक्टरचा समावेश आहे, अशी माहिती जव्हार तहसीलदार बाळा भला यांनीदिली आहे.