शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी खड्ड्यात आदळली, डॉक्टर थोडक्यात बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:13 IST

मानपाडा रोड-आइस फॅक्टरी ते जिमखाना रस्त्यावर घटना : रस्त्यांच्या अवस्थेबाबत आयुक्तांना पाठवला ई-मेल

डोंबिवली : मुसळधार पावसामुळे काही दिवसांतच रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांचा जीव आता धोक्यात येऊ लागला आहे. शहरातील डॉ. आनंद हर्डीकर हे रविवारी सकाळी दुचाकीवरून जात असताना त्यांची दुचाकी खड्ड्यात जोरदार आदळली. यावेळी त्यांनी कशीबशी गाडी सावरल्याने ते थोडक्यात बचावले. दरम्यान, जागोजागी पडलेले खड्डे पाहून त्यांनी केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांना ई-मेल पाठवून जीवितहानी झाल्यावरच खड्ड्यांची दखल घेतली जाणार का, असा संतप्त सवाल केला आहे.

यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले असले, तरी काही रस्त्यांची कामे ठरावीक मुदतीत केडीएमसी व अन्य प्राधिकरणांना मार्गी लावता आलेली नाहीत. तर, काही रस्त्यांवरील डांबर सध्याच्या मुसळधार पावसात वाहून गेले आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत बहुतांश ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यांवरील मॅनहोलच्या चेंबरभोवतीचे डांबर, काँक्रिट उखडल्याने तेथे खड्डे पडले आहेत. शहरातील निवासी विभाग, तसेच काही ठिकाणी रस्त्यांना जोडणाऱ्या मुख्य चौकांतही खड्डे पडले आहेत. अशा खड्डेमय स्थितीत असलेल्या मानपाडा रोड ते आइस फॅक्टरी रस्त्यावरून डॉ. हर्डीकर रविवारी सकाळी ८ वाजता दुचाकीने डोंबिवली जिमखान्यात जात असताना त्यांची गाडी खड्ड्यात आदळली. यावेळी त्यांनी गाडी कशीबशी सावरल्याने ते थोडक्यात बचावले. परंतु, अन्य कोणाला दुखापत होऊ नये, यासाठी आयुक्तांना खरमरीत मेल पाठवून रस्त्याच्या झालेल्या दयनीय अवस्थेकडे हर्डीकर यांनी लक्ष वेधले आहे. तसेच जीवितहानी झाल्याशिवाय दखल घ्यायची नाही का, असा सवालही त्यांनी केला आहे.जीव गेल्यावरच जाग येणार का?आमच्याकडून कर वसूल करताना केडीएमसीला विसर पडत नाही, मग रस्ते सुधारण्याकडे दुर्लक्ष का होते. ही नेहमीचीच परिस्थिती आहे. पण सुधारणा करण्याकडे मात्र कानाडोळा केला जातो. एखाद्या ठिकाणी बळी गेल्यावर यंत्रणा जागी होते, मग आता मानपाडा रोड ते डोंबिवली जिमखाना या रस्त्याची झालेली चाळण पाहता येथेही जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल डॉ. हर्डीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.आयुक्तांकडून प्रतिसाद नाहीदरम्यान, यासंदर्भात आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी ‘लोकमत’ने मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.