डोंबिवली- कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात ४५ लक्ष रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन आज आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते संपन्न झाले. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व आमदार सुभाष भोईर यांच्या प्रयत्नातून २५१५ योजनेअंतर्गत विविध विकासकामे करण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने वडवली गावांतर्गत रस्ता १५ लक्ष, बाळे चौक ते बाळे गावांतर्गत रस्ता १५ लक्ष व शिरढोण गावांतर्गत रस्ता १५ लक्ष असे एकूण ४५ लक्ष रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले. त्यावेळी तालुकाप्रमुख एकनाथ पाटील, जि .प. सदस्य रमेश पाटील, गटविकास अधिकारी पालवे, पं. स. सदस्य किरण ठोंबरे, भरत भोईर, विभागप्रमुख गणेश जेपाल, नेताजी पाटील, उप विभागप्रमुख जितेंद्र पाटील, सरपंच नागूबाई जोमा पाटील, सुनील बोराडे, परेश ठक्कर, अनंता पाटील,राम पाटील, गोपीनाथ पाटील यांच्यासह गावकरी प्रमाणावर उपस्थित होते.
कल्याण ग्रामीणमध्ये आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते रस्त्यांचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 16:47 IST
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात ४५ लक्ष रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन आज आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते मंगळवारी संपन्न झाले.
कल्याण ग्रामीणमध्ये आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते रस्त्यांचे भूमिपूजन
ठळक मुद्देएकूण ४५ लक्ष रुपयांच्या कामांचे भूमिपूजन२५१५ योजनेअंतर्गत विविध विकासकामे करण्यात येणार