शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

भोंगळ कारभार! व्हेंटिलेटरअभावी सर्पदंश झालेल्या मजुराचा मृत्यू; भिवंडीतील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 00:18 IST

रुग्णाला सर्पदंश झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळानंतर रक्तदाब वाढला व त्याला फीट आली

भिवंडी : येथील इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरअभावी सर्पदंश झालेल्या एका आदिवासी मजुराचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. या घटनेने इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा उडालेला बोजवारा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

विठ्ठल देव कोरडा (५५ वर्षे, रा. जव्हार) असे या आदिवासी मजुराचे नाव आहे. ते आपल्या पत्नीसह कारीवली येथील एका बांधकामावर मजुरीचे काम करीत होते. गुरुवारी दुुपारी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी या मजुराच्या पायाला सर्पदंश झाला. येथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. या वेळी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी उपचार केले. मात्र त्यानंतर सायंकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी कळवा किंवा मुंबई येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र रुग्णाची प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णाची प्रकृती जास्त खालावल्यानंतर रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. हाच सल्ला जेव्हा आम्ही रुग्णाला घेऊन आलो तेव्हाच दिला असता तर आमचा रुग्ण दगावला नसता, असा आरोप या रुग्णासोबत असलेल्या नागरिकांनी डॉक्टरांवर केला. याबाबत उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णावर आवश्यक तेवढे प्राथमिक उपचार करण्यात आले.

इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरची सोय नाही. सर्व व्हेंटिलेटर हे कोविडसाठी वापरण्यात आल्याने तुमच्या रुग्णाला व्हेंटिलेटर उपलब्ध झाला नाही आणि त्या रुग्णाला व्हेंटिलेटरची अत्यंत आवश्यकता होती. त्यासाठी या रुग्णास आम्ही पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला, अशी प्रतिक्रिया येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री डोंगरे यांनी दिली.

रक्तदाब वाढल्याने फीट रुग्णाला सर्पदंश झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळानंतर रक्तदाब वाढला व त्याला फीट आली. कदाचित त्याला ब्रेनहॅमरेजसारखा त्रास झाला असावा, ज्यात या रुग्णाचा मृत्यू झाला. व्हेंटिलेटरबद्दल बोलायचे झाले तर नॉनकोविडसाठी व्हेंटिलेटर सुविधा नाही. त्याचबरोबर व्हेंटिलेटर हाताळणारे तज्ज्ञ नाहीत, असे इंदिरा गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल