शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

भिवंडीतील टोलनाके बनले दादागिरीचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 23:55 IST

भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गावर पडघा टोलनाका, भिवंडी-कल्याण मार्गावर

नितीन पंडित, भिवंडीवंडी शहर व ग्रामीण भागात व्यापार, व्यवसाय व गोदामपट्टा विकसित झाला असल्याने या ठिकाणी ट्रान्सपोर्ट व्यवसाय मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. अवजड वाहनांची वर्दळ नेहमीच सुरू असते. याच बाबींचा विचार करून इतर शहरांतून तसेच राज्यातून भिवंडीत दाखल होणाऱ्या सर्वच मार्गावर शासनाने टोलनाके बसवले आहेत. एकट्या भिवंडी तालुक्याचा विचार केला तर पाच टोलनाके भिवंडीत आहेत. मात्र, येथील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. या टोलनाक्यांवर टोलवसुली मात्र जोरात नव्हे तर सक्तीने सुरू असते, त्यामुळे भिवंडीतील हे टोलनाके दादागिरीचे अड्डे बनले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गावर पडघा टोलनाका, भिवंडी-कल्याण मार्गावर कोन-गोवा टोलनाका, भिवंडी-वसई मार्गावर मालोडी टोलनाका, भिवंडी-ठाणे मार्गावर कशेळी टोलनाका तसेच भिवंडी-वाडा महामार्गावर कवाड येथे टोलनाका आहे. सध्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होणाºया अपघातांमुळे नागरिकांच्या आंदोलनानंतर कवाड टोलनाका बंद आहे. मात्र, इतर चारही टोलनाके दिवसरात्र सुरूच आहेत. या टोलनाक्यांवरून दिवसरात्र मोठ्या प्रमाणात टोलवसुली केली जाते. ही टोलवसुली रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी आहे की वैयक्तिक फायद्यासाठी, याची जाणीव बहुधा टोलनाक्यावरील टोलवसुली करणाºया कर्मचाऱ्यांना नसावी. त्यामुळे त्यांच्याकडून टोलवसुली सक्तीने केली जात आहे. त्यामुळे या टोल कर्मचाºयांना शिष्टाचाराची शिकवण देण्याची गरज आहे. कारण, या टोल कर्मचाºयांकडून अनेक वेळा सक्तीने टोलवसुली करताना वादविवाद झाल्याच्या अनेक घटना येथील सर्वच टोलनाक्यांवर घडत आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोलनाक्यावर वाहतूककोंडी झाली असताना या वाहतूककोंडीत रुग्णवाहिका अडकली होती. त्यावेळी या रुग्णवाहिकेला रस्ता करून द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी बाळासाहेब निंबाळकर यांनी केली असता मुजोर टोल कर्मचाºयांनी धक्काबुक्की केली. निंबाळकर हे शनिवारी आपल्या कुटुंबासह शिर्डीसाठी निघाले होते. त्यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेने टोल कर्मचाºयांच्या मुजोरीचे दर्शन सर्वांना घडले. विशेष म्हणजे पडघा टोलनाक्यावर वाहनचालकांशी टोल कर्मचाºयांच्या धक्काबुक्कीची घटना ही काही नवी नाही. यापूर्वी याच टोलनाक्यावर टोलवसुलीवरून थेट हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. टोलकंपनीचे मालक मुद्दाम आपल्या टोलनाक्यांवर अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना टोलवसुलीसाठी ठेवतात, असा आरोप आहे. एखाद्या वाहनचालकाने काही कारणास्तव टोल देण्यास असमर्थता दर्शविली की, हे टोल कर्मचारी थेट मारहाणच करतात. याची प्रचीती या मार्गावरून प्रवास करीत असलेल्या सर्वच प्रवाशांना आल्याशिवाय राहणार नाही. एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांशी जर हे टोल कर्मचारी धक्काबुक्कीचे वर्तन करीत असतील, तर सामान्य वाहनचालकांचे काय, असा सवाल उपस्थित होतो. त्यामुळे वाहनचालकांशी मुजोरीने वागणाºया व दादागिरीने टोल वसूल करणाºया मुजोर टोल कर्मचाºयांवर पोलिसांतर्फे कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे, जेणेकरून या दादागिरीला कुठेतरी आवर घातला जाईल. टोलनाक्यावर टोलवसुलीचे काम करणे म्हणजे आपल्या खासगी मालमतेची वसुली करीत आहोत, असे नसून आपण या टोलनाक्यावर पगारावर काम करणारे नोकर आहोत, मारहाण करणारे ‘दादा’ नाहीत, याची जाण टोलवसुलीचे काम करणाºया प्रत्येक कर्मचाºयांनी ठेवणे गरजेचे आहे. किंबहुना, तशी जाण पोलीस प्रशासन व संबंधित अधिकाºयांनी करून देणे गरजेचे आहे. अन्यथा, सक्तीच्या टोलवसुलीदरम्यान झालेल्या वादातून एखाद्याला आपल्या जीवाला गमवावा लागेल. त्यामुळे टोलनाक्यांवरील दादागिरी वेळीच थांबविणे काळाची गरज आहे.भिवंडी हा व्यापारी भाग असून गोदामपट्टा आहे. त्यामुळे या परिसरात पाच टोलनाके येतात. या टोलनाक्यांवरील कर्मचाºयांच्या दादागिरीचा अनुभव सर्वसामान्यांना अनेकदा येतो. टोलनाके कंत्राटदारांकडून रस्त्याची देखभाल फारशी होत नसल्याने अनेकदा टोल देण्यास लोक विरोध करतात. नेमकी हीच संधी साधून त्यांना दमदाटी केली जाते व वेळप्रसंगी मारहाण केली जाते.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे