शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत खासगी ठेकेदार करणार घरपट्टी पाणीपट्टी वसुली; महासभेत ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 21:34 IST

अधिकृत माहिती मनपा प्रशासनाकडून अजूनही मिळाली नाही.

- नितिन पंडीत

भिवंडी: हलगर्जी कारभाराबाबत राज्याभर चर्चेत असणारी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा ठेका खासगी ठेकेदाराला दिल्याने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भिवंडी महानगर पालिकेची तहकूब महासभा बुधवारी ऑनलाइन पद्धतीने पार पाडली . विशेष म्हणजे सभागृहात हजर राहण्याची मुभा देखील या महासभेत होती.  या महासभेत शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा ठेका खासगी ठेकेदाराला देण्याचा ठराव पास करण्यात आला आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मनपा प्रशासनाकडून अजूनही मिळाली नाही. मात्र तसा ठराव पास करण्यात आला असल्याचे खात्री लायक वृत्त मनपाच्या एका अधिकाऱ्याने दिले आहे. महत्वाचे म्हणजे महासभेच्या पटलावर घरपट्टी व पाणीपट्टीचा खासगी ठेका देण्या संदर्भाचा विषय देखील नव्हता.

आयत्या वेळेत या विषय महासभेत शेवटी ठेवण्यात आला होता व त्याला मान्यता मिळाली अशी माहिती मनपाचे नगरसेवक निलेश चौधरी यांनी दिली आहे. विशेष म्हणजे आज महासभेसाठी सभागृहात आपण स्वतः हजर होतो. विषय पत्रिकेतील विषय आटोपते आल्या नंतर आपण घरी आलो माझ्या सोबत अनेक नगर सेवक देखील सभागृहा बाहेर पडले होते. मात्र मी घरी आल्या नंतर यासंदर्भात मला माहिती मिळाली की घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा ठेका देण्यासंदर्भात महासभेत विषय चर्चेला आला व त्यास मान्यता मिळाली.

आपण नगरसेवक असून देखील आपणाला यासंदर्भात काहीही माहिती नसून शहरातील नागरिकांसाठी अत्यावश्यक असलेला विषय तहकूब महासभेत अशा प्रकारे घेणे बेकायदेशीर असून त्यास आपण लेखी विरोध करणार असून हा बेकायदेशीर ठराव नामंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत अशी माहिती नगरसेवक निलेश चौधरी यांनी दिली आहे. 

विशेष म्हणजे महासभेच्या विषय पत्रिकेत विषय नसतांना देखील तहकूब महासभेत हा ठराव पास झालाच कसा अशी चर्चा शहरात असून हा ठराव पास झाल्यास राज्यात घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा खासगी ठेका देणारी भिवंडी महापालिका हि राज्यातील बहुतेक पहिली महानगर पालिका ठरणार असून आता या ठारावामुळे शहरातील राजकीय  निश्चितच ढवळून निघणार आहे. 

टॅग्स :Bhiwandiभिवंडी