शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी पालिका: बायोमेट्रिक ‘हजेरी’ न लागल्याने वेतनकपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:57 IST

बायोमेट्रीक यंत्रांमध्ये झालेल्या बिघाडामुळे व बदल्या झालेल्या कामगारांनी हजेरीकरिता बोटांचे ठसे न दिल्याने भिवंडी महापालिकेच्या कामगार, कर्मचा-यांच्या आॅक्टोबर महिन्याच्या पगाराबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

भिवंडी : बायोमेट्रीक यंत्रांमध्ये झालेल्या बिघाडामुळे व बदल्या झालेल्या कामगारांनी हजेरीकरिता बोटांचे ठसे न दिल्याने भिवंडी महापालिकेच्या कामगार, कर्मचा-यांच्या आॅक्टोबर महिन्याच्या पगाराबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. अगोदरच सफाई कामगारांनी वेगवेगळ्या प्रभागात साफसफाई केली किंवा कसे, याबाबत नगरसेवकाकडून दाखला आणल्यावरच वेतन देण्याबाबतचा फतवा आयुक्तांनी काढल्याने असंतोष निर्माण झालेला असताना आता बायोमेट्रीकमुळे आणखी भडका उडाला आहे.पालिकेत पाच हजारांपेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी काम करत असून शहर स्वच्छता विभागात सुमारे २२०० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. कार्यालयीन कर्मचाºयांनी बायोमेट्रीक पद्धतीने आपली हजेरी नोंदवली असेल, तरच पगार देण्याचे आदेश आयुक्तांनी आस्थापना व लेखा विभागास दिले आहेत. कर्मचाºयांच्या बदल्या झाल्याने काहींनी आपली हजेरी बायोमेट्रीक पद्धतीने लावलेली नाही. आस्थापना विभागाच्या दाव्यानुसार, जवळपास ५० टक्के कर्मचाºयांनी या ना त्या कारणास्तव बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी न लावल्याने कर्मचाºयांच्या आॅक्टोबरच्या पगारात कपात केली जाण्याची शक्यता आहे.बायोमेट्रीक पद्धतीने पगार करण्यासाठी आस्थापना विभागाने संगणक विभागाकडून कर्मचाºयांच्या उपस्थितीचा अहवाल मागवला आहे. मात्र, अद्याप आस्थापना विभागास अहवाल प्राप्त झालेला नाही. पालिकेचा संगणक विभाग निष्क्रिय असल्याचा आरोप कर्मचाºयांनी केला असून सदोष बायोमेट्रीक मशीनमधील आमची गैरहजेरी लागल्याचा त्यांचा दावा आहे. काही कामगार संघटनांनी पालिका आयुक्तांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत.संगणक विभागप्रमुख प्रशांत बायस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही. पालिकेत कामगार कल्याण अधिकारी नसल्याने कामगारांवर अन्याय होत असल्याचा दावा कामगार संघटनाच्या पदाधिकाºयांनी केला. आयुक्तांच्या या निर्णयाने पालिकेच्या सफाई कामगारांमध्ये संतापाचे वातवरण पसरले आहे. त्यातच बायोमेट्रिक हजेरीने त्यांच्या संतापात अधिकच भर पडली आहे.आयुक्तांकडे तक्रारी-सफाई कामगार, स्वच्छता निरीक्षक व अधिकारी प्रभागात जाऊन सफाई करत नाहीत, जंतुनाशकांची फवारणी करत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने आयुक्तांनी सफाई कर्मचाºयांना प्रभागात सफाई केल्याचे शिफारसपत्र नगरसेवकांकडून आणण्यास सांगितले.

टॅग्स :bhiwandiभिवंडी