शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी महापालिका मतदार याद्यांमध्ये घोळ

By admin | Updated: April 22, 2017 00:10 IST

भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये ५० हजार ९२२ बोगस मतदारांचा समावेश असल्याने उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक

मुंबई : भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये ५० हजार ९२२ बोगस मतदारांचा समावेश असल्याने उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला चांगलेच फटकारले. मतदार याद्यांत घोळ असताना निवडणूक कार्यक्रम जाहीर कसा केला? मतदार याद्या कोण दुरुस्त करणार, अशी प्रश्नांची सरबत्ती करत उच्च न्यायालयाने २४ एप्रिलला केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.भिवंडी महापालिकेची निवडणूक येत्या २४ मे रोजी आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्या सदोष असल्याने या याद्यांमध्ये दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी भिवंडीच्या फैजल अन्सारी, संजय काबुकर आणि सिद्धेश्वर कामूर्ती यांनी उच्च न्याायालयात धाव घेतली आहे. या याचिकांवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती.याचिकांनुसार, भिवंडीच्या मतदार याद्यांमध्ये एकूण ५० हजार ९२२ मतदार बोगस आहेत. प्रभाग क्रमांक १७ व १८मध्ये सुमारे दोन ते तीन हजार मतदारांची नावे दोनदा आली आहेत. हा घोळ निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिला तरीही त्यांनी यादीत दुरुस्ती करण्यास नकार दिला. मतदार याद्यांतील बोगस नावे वगळण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाला द्यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी) २४ एप्रिलला अधिकाऱ्यांनी हजर रहावे- ‘याद्या सदोष आहेत, हे माहीत असूनसुद्धा तुम्ही (आयुक्त) निवडणूक कार्यक्रम का जाहीर केलात? या याद्या कोण बनवतं? या घोळाला जबाबदार कोण आणि या याद्या दोषविरहित कोण करणार,’ अशा प्रश्नांची सरबत्तीच खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांकडे केली.- या याद्या केंद्रीय निवडणूक आयोग तयार करत असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला दिली. त्यावर उच्च न्यायालयाने २४ एप्रिलला केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाच्या संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.