शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

भिवंडी महानगरपालिचा करवाढ नसलेला ८२२ कोटी ४३ लाख ३२ हजार रकमेचा अंदाजपत्रक स्थायी समितीस सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 19:01 IST

भुयारी गटर योजनेची कामे पूर्ण करण्याबरोबरच स्व मीनाताई ठाकरे रंगायतनाच्या दुरुस्ती कामास देखील गती येणार आहे. 

-नितिन पंडीत 

भिवंडी- आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेत महापालिका प्रशासनाने कोणतीही करवाढ नसलेला सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता १२ लाख ४२ हजार शिल्लक दर्शवणारे ८२२ कोटी ४३ लाख ३२ हजार रकमेचे मूळ अंदाजपत्रक मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी मंगळवारी सादर केला. विशेष म्हणजे मागील वर्षीचा म्हणजे सन २०२१ - २२ चा ८२० कोटी ३२ लाख ८७ हजार रुपयाचे सुधारित अंदाजपत्रक देखील मनपा आयुक्तांनी यावेळी सादर केले. मागील वर्षाच्या तुलनेत फक्त सुमारे २ कोटी रुपये अर्थसंकल्पात वाढीव तरतूद करण्यात आल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत हा अर्थसंकल्प अधिक वस्तुनिष्ठ असल्याचा दावा मनपा आयुक्तांनी केला आहे.

अर्थसंकल्पात शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी १०० एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा होणार असून , मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. त्याच बरोबर रस्ते दुरुस्ती , मनपाचे बाई गुलाबबाई पेटिट रुग्णालय सुरु करणे , केंद्राच्या निधीतून चार नागरी आरोग्य केंद्र पूर्ण करणे या कामांना प्राधान्य देण्यात आले असून शहरातील वऱहाळदेवी तलाव येथील जुन्या शहरासाठी जो दोन एमएलडी पाणी पुरवठा होत होता त्या ऐवजी आता पाच एमएलडी होणार आहे त्याच बरोबर शहरातील नागरिकांना १३५ लिटर प्रति कुटुंब पाणीपुरवठा नियमित करण्याचा प्रयत्न मनपा करणार आहे. भुयारी गटर योजनेची कामे पूर्ण करण्याबरोबरच स्व मीनाताई ठाकरे रंगायतनाच्या दुरुस्ती कामास देखील गती येणार आहे. 

मालमता कर वसुलीसाठी जिआयएस प्रणाली मार्फत सर्वेक्षण करण्यात येणार असून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन तसेच अग्निशामक दल यंत्रणा सुधारणा , नादुरुस्त पालिका शाळा इमारती दुरुस्ती , शहरातील वृक्ष गणना करून पर्यावरण संवर्धन , वऱ्हाळ  तलाव व भादवड तलाव सुशोभीकरण या कामांना प्राधान्य दिले जाणार असून शहरांतर्गत रस्ते वाहतूक सुविधा त्रासदायक असल्याने परिवहन सेवा सुरु करण्या बाबत कोणताही विचार प्रशासनाचा नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. एकंदरीत गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीचा अर्थसंकल्प मनपा आयुक्तांनी सादर केला असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती.  

टॅग्स :Bhiwandiभिवंडी