शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भिवंडी महापालिका चार प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुका बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 21:45 IST

प्रभाग समिती एक साठी झालेल्या निवडणुकीत आरपीआय एकतावादी विजयी 

- नितिन पंडीत

भिवंडी- भिवंडी महापालिकेच्या पाचही प्रभाग समिती सभापती पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने गुरुवारी पालिका सभागृहात जिल्हाधिकारी डॉ राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवडणुकी दरम्यान प्रभाग समिती दोन ते पाच अशा चार प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या असून प्रभाग समिती क्रमांक एक मध्ये झालेल्या निवडणुकीत आरपीआय एकतावादी पक्षाचे शरद धुळे यांनी काँग्रेस उमेदवार श्रीमती कशाफ अश्रफ खान यांचा ६ मातांच्या मताधिक्याने पराभव केला. धुळे यांना ११ मते तर खान यांना अवघी ५ मते मिळाली.

निवडणूक सुरू करण्यापूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेत प्रभाग समिती दोन मधून मतलूब अफजल खान यांनी अर्ज मागे घेतल्याने प्रशांत लाड हे काँग्रेस उमेदवार विजयी झाले तर प्रभाग समिती क्रमांक एक मध्ये श्रीमती अंजू अहमद सिद्दिकी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने प्रभाग समिती क्रमांक एक मध्ये शरद नामदेव धुळे (आरपीआय एकतावादी ) श्रीमती कशाफ अश्रफ खान ( काँग्रेस) यांच्यात सरळ लढत झाली . ज्यात धुळे विजयी झाले. 

महापालिकेतील पाच प्रभाग समित्यांमध्ये काँग्रेस चे ३,  भाजपा १ तर आरपीआय एकतावादीचे १ असे उमेदवार निवडून आले आहेत. प्रभाग समिती सभापतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतानाच प्रभाग समिती क्रमांक तीन मध्ये भाजपा नगरसेविका सौ.नंदिनी महेंद्र गायकवाड , प्रभाग समिती क्रमांक चार मध्ये काँग्रेसच्या श्रीमती नाजीमा मो. हदीस अन्सारी, प्रभाग समिती क्रमांक पाच मध्ये काँग्रेसचे परवेज अहमद सिराज अ.मोमीन यांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या तिघांची बिनविरोध निवड झाली होती.  त्यांची अधिकृत घोषणा सभागृहात पिठासन अधिकारी राजेश नार्वेकर यांनी गुरुवारी जाहीर केली . याप्रसंगी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख ,उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे ,उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे आदी उपस्थित होते .तर विजयी सभापतींना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी महानगरपालिका सभाशास्त्र हे पुस्तक देऊन सन्मान केला.

टॅग्स :bhiwandiभिवंडी