शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

'भिवंडी महापालिकेत मराठी नामफलकांची सक्ती करावी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:26 IST

विरोधी पक्षनेत्यांची आयुक्तांकडे मागणी

भिवंडी : राज्य शासनाने शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देऊन कारभार करावा, असे आदेश दिले असताना भिवंडी पालिकेत या आदेशांची पायमल्ली होत आहे. मनपाच्या प्रभाग समित्यांच्या सभापतींच्या कार्यालयातील दरवाजांवरचे बहुतांश नामफलक उर्दू भाषेत आहेत. आयुक्तांनी तातडीने ते काढून त्याजागी मराठी पाट्या लावण्याची मागणी भिवंडी मनपाचे विरोधी पक्षनेते यशवंत टावरे यांनी गुरु वारी महापालिकेत झालेल्या मराठी भाषा दिन कार्यक्र मप्रसंगी आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्याकडे केली.कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा दिन सर्वत्र साजरा केला जातो. त्याअनुषंगाने पालिकेच्या वतीने कुसुमाग्रजांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्र म पालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून यशवंत टावरे, डॉ. प्रवीण आष्टीकर, उपायुक्त दीपक कुरळेकर, बांधकाम अभियंता एल.पी. गायकवाड, सुभाष झळके, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. भिवंडी पालिकेत सर्व भाषिक नगरसेवक आहेत. मात्र, प्रभाग समिती कार्यालयात अनेक सभापतींनी त्यांच्या नावाच्या पाट्यांत उर्दू भाषेत लावल्या आहेत. महापालिकेत घरपट्टी, पाणीपट्टी, जन्म-मृत्यू दाखला तसेच अन्य कामांसाठी आॅनलाइन सेवा इंग्रजी भाषेत आहे.भिवंडी हे कामगारांचे शहर आहे. त्यांना उर्दूचे संपूर्ण ज्ञान नसल्याने विविध अडचणी येतात. त्यामुळे आयुक्तांनी उर्दू भाषिक पाट्या काढून टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी टावरे यांनी केली. १३ फेब्रुवारी रोजी निवेदन दिल्याचे स्मरणही त्यांनी यावेळी आयुक्तांना करून दिले.